read Article in any Language, You can use Google Translate. See above Top side given the Google Translate Box
1) चार दशकांचा लज्जतदार प्रवास
2) मांसाहाराची 'राजधानी'
3) सर्वसामान्यांना परवडणारा 'एसटीवाला ढाबा'
पुणे-कोल्हापूर महामार्गावरील इतर हॉटेलांसारखा इथं पांढरा रस्सा मिळत नाही. तांबड्या रश्श्याची वाटी, भाकरी, सुक्कं मटण आणि सोबतीला भाकरी. एवढी साधी थाळी असूनही इथल्या सुक्क्या मटणाची आणि रश्श्याची चव भल्याभल्यांना या हॉटेलात खेचून आणते आणि त्यांचा जीव तृप्त करते. कराड जिल्ह्यातील नेर्ले गावाजवळ असलेले हेच ते हॉटेल 'श्री दत्त भुवन.' महामार्गावर साधी एक जाहिरात नसतानाही लोक इथे थांबतात आणि 'श्री दत्त भुवन' च्या मटणाची चव चाखूनच पुढच्या प्रवासाला निघतात.
कोल्हापूरकडून पुण्याला येताना कराडच्या अलीकडे काही अंतरावर नेर्ले नावाचं गाव आहे. या गावात महामार्गालगतच सेवारस्त्यावर 'श्री दत्त भुवन' लागते. कोल्हापूरमधून रात्री पुण्याकड़े यायला निघाला, की बरोबर जेवणाच्या वेळेला नागरिक 'श्री दत्त भवन' पाशी येऊन ठेपतात. ४२ वर्षापूर्वी म्हणजे १९८२ साली खाशाबा कदम यांनी या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला नेर्लेच्या बसस्टंडवर कदमांची हातगाडी होती. तिथ भेळ, चहा, नाश्त्याचे पदार्थ उपलब्ध होते. कालांतरानं ही गाडी बंद करून कदम यांच्या महामार्गालगत असलेल्या जागेमध्ये हॉटेल सुरू करण्याचा निर्णय झाला आणि 'श्री दत्त भुवन' च्या चवीष्ट प्रवासाचा जन्म झाला.
Highway Food
Table of Content
1) चार दशकांचा लज्जतदार प्रवास
2) मांसाहाराची 'राजधानी'
3) सर्वसामान्यांना परवडणारा 'एसटीवाला ढाबा'
4) दाल-बाटीसाठी प्रसिद्ध 'राजस्थानी ढाबा'
1) चार दशकांचा लज्जतदार प्रवास (Highway Food)
पुणे-कोल्हापूर महामार्गावरील इतर हॉटेलांसारखा इथं पांढरा रस्सा मिळत नाही. तांबड्या रश्श्याची वाटी, भाकरी, सुक्कं मटण आणि सोबतीला भाकरी. एवढी साधी थाळी असूनही इथल्या सुक्क्या मटणाची आणि रश्श्याची चव भल्याभल्यांना या हॉटेलात खेचून आणते आणि त्यांचा जीव तृप्त करते. कराड जिल्ह्यातील नेर्ले गावाजवळ असलेले हेच ते हॉटेल 'श्री दत्त भुवन.' महामार्गावर साधी एक जाहिरात नसतानाही लोक इथे थांबतात आणि 'श्री दत्त भुवन' च्या मटणाची चव चाखूनच पुढच्या प्रवासाला निघतात.
इसे जरूर पढ़ें:- Moringa in Hindi : मोरिंगा (सहजन) के इतने 200 फायदे की आप हैरान रह जाएंगे, और इसके 3 साइड इफेक्ट्स भी जान लें
नागरिकांना मोठे मेन्यू कार्ड देऊन संभ्रमात टाकायचं नाही, असं सुरुवातीपासूनच ठरवल्यान या हॉटेलमध्ये आजही दोनच मांसाहारी पदार्थ मिळतात, एक सुूक्कं मटण आणि दसरे अंड्याचे पदार्थ, चिकनला हॉटेलमध्ये जागा नाही. शाकाहारी माणसासाठी ठरलेल्या दोन-तीन भाज्या उपलब्ध आहेत, या पलीकडे काही मिळत नाही,' असे सध्या हॉटेलची धुरा सांभाळणारे खशाबा कदम यांचे पुत्र प्रमोद कदम सांगतात.
आजही प्रमोद स्वतः सर्व पदार्थ तयार करत असून, मसाला वाटण्यापासून तो शिजवण्यापर्यंत सगळं काम स्वतः करतात, सुक्क मटण, रस्सा वाटी, भाकरी आणि कांदा-लिंबू अशी साधी थाळी आहे; पण हीच या हॉटेलची मोठी ताकद असल्याच कदम आवर्जून नमूद करतात. प्रमोद यांच्या जोडीला श्रेयस कदम ही पुढची पिढ़ी या हॉटेलचा कारभार हाकण्यात अग्रेसर आहे.
कसं जाल ? :- कोल्हापूरकडून पुण्याला यायला निघालात, की कराडच्या अलीकड़े २२ किमी अंतरावर नेर्ले नावाचं गाव आहे. याच गावात महामार्गाच्या डाव्या बाजूच्या सेवा रस्त्याला लागून हॉटेल 'श्री दत्त भुवन' आहे. कोल्हापूर आणि कराडच्या मध्ये असल्यानं रात्री जेवणाच्या वेळेला इथं जाता येतं. सकाळी ११.३० ते रात्री ११ या वेळेत हे हॉटेल सुरू असत.

2) मांसाहाराची 'राजधानी' (Highway Food)
कोल्हापूरकडून पुण्याला येत असाल किंया पुण्याहून कोल्हापूरला जात असाल, तर शहराच्या दिशेनं जाणाच्या रस्त्यावर एक हॉटेल खवय्यांना कायम खुणावत असतं. कोल्हापुरी मसाल्यातलं मटण, सुक्क मटण, चिकन आणि तांबडा-पांढरा रस्सा असा फक्कड बेत वाढणारं हे हॉटेल खवय्यांसाठी मांसाहाराची जणू 'राजधानी' च झालं आहे. 'राजधानी' याच नावानं असलेलं हे हॉटेल १९९५ पासून कोल्हापूरकरांसोबतच या शहरात येणाऱ्या पर्यंटकांना आपल्या मेजवानीन तृप्त करत आलं आहे.
किरण पाटोळे यांनी १९९५ मध्ये या हॉटेलची सुरुवात केली. सुरुवातीला काही मर्यादित पदार्थासोबत हॉटेलची सुरुवात झाली होती, कालांतरानं पदार्थांची संख्या वाढत गेली. आता मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थही या हॉटिलमध्ये उपलब्ध असतात. कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यानंतर अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर राजधानी हॉटेल आहे. एका वेळी साधारण १०० ते १५० माणसं बसुन जेवू शकतील, इतकी व्यवस्था करण्यात आली आहे. तांबडा, पांढरा रस्सा 'अनलिमिटेड' तर आहेच; शिवाय सोबतीला चिकन मसाला, मटण मसाला, मटण खीमा, चिकन सुक्कं, मटण सुक्कं असे वेगवेगळे पर्याय खवय्यांसाठी आहेत.
कोल्हापूरच्या खोबऱ्याच्या खास वाटणातील हा मसालेदार मांसाहार जीवाला तृप्त करणारा आहे. स्वच्छता हे या हॉटेलचं आणखी एक वैशिष्ट्य, जे इतर बऱ्याच नॉनक्हेज हॉटेलमध्ये पाहायला मिळत नाही.
गारवा देणारी 'थंडाई'
कोल्हापूरमध्ये भरपेट मांसाहार केल्यानंतर पोटाला गारवा हवा असेल, तर 'सोळंकी अँड सन्स' यांची थंडाई प्यायला विसरू नका. कोल्हापुरातील दसरा चौकाच्या जवळ असलेलं सोळंकींचं हे दुकान गेल्या ६० वर्षापासून कार्यरत आहे. आइस्क्रीमचे विविध प्रकार आणि पहिलवानांसाठी तयार केली जाते, तशी खास थंडाई इथे प्यायला मिळते.कसं जाल ? :- कोल्हापूर महामार्गालगत असलेल्या कमानीतून प्रवेश केला, की पुढं एक ते दीड किलोमीटरला उजव्या बाजूला 'राजधानी' हॉटेलचा फलक लागलेला दिसतो. कोल्हापूरहून पुण्याकडे येताना हॉटेल डाव्या बाजूस लागत.
3) सर्वसामान्यांना परवडणारा 'एसटीवाला ढाबा' (Highway Food)
साधारण २१ वर्ष हॉटेल क्षेत्रात मिळेल ते काम केल्यानंतर अशोक भोसले सिद्धी यांनी 'साई सिद्धी' नावाच स्वतःचं हॉटेल सुरू केलं. नागरिकांना प्रवासात कमी पैशांत पोटभर आणि चांगल जेवण मिळावं, या उद्देशान हे हॉटेल त्यांनी सुरू केलं आहे. या हॉटेलमध्ये दाल तड़का, शेवभाजी, मिक्स क्हेज, व्हेज कोल्हापुरी, पनीर मसाला ते चिकन मालवणी, मटण मालवणी, चिकन करी, मटण करीपर्यंत वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. स्टार्टरमध्येही चिकन फ्राय, मटण फ्राय, चिकन तंदूर असे लज्जतदार पदार्थ उपलब्ध आहेत.
या हॉटेलमध्ये व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, मसाला राइस, अख्खा मसूर, दाल फ्राय, व्हेज भाजी, अंडा करी, भुर्जी अशा पदार्थासोबतच नाश्त्यासाठी पोहे, उपीट, डोसा, इडली असेही पदार्थ आहेत. थाळी स्पेशलमध्ये अंडा थाळी, चिकन थाळी, मटण थाळी, व्हेज थाळीही उपलब्ध आहे; त्यामुळेच पुणे-कोल्हापूर महामार्गावर ये-जा करणाऱ्या साधारण ७०पेक्षा जास्त एसटी बस इथं जेवण किंवा नाश्त्यासाठी थांबतात. एसटीचा अधिकृत थांबा असल्यानं ३० रुपयांत चहा-नाश्ताही मिळतो; त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही समाधान मिळत. म्हणून, या हॉटेलची 'एसटीवाला ढाबा' म्हणूनही ओळख आहे. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचा दर्जा चांगला असल्यानं प्रवाशांकडूनही एसटीला एकही तक्रार झाली नसल्याचं भोसले सांगतात.
कसं जाल ? :- पुणे ते कोल्हापूर मार्गावर सातारा ते कराड रस्यात काशीळ नावाचं गाव आहे. मुख्य रस्त्यावर काशीळ फाट्यावर 'साई सिद्धी' हॉटेल आहे.
4) दाल-बाटीसाठी प्रसिद्ध 'राजस्थानी ढाबा' (Highway Food)
पुण्याहून साताऱ्याला निघालं किंवा साताऱ्याहून पुण्याकडे येत असाल, तर दोन्ही बाजूला तुम्हाला 'राजस्थानी ढाबा' या नावानंच हे ढाबे सापडतील. मग कुणी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हॉटेलच्या नावात आडनावही टाकून घेतलं आहे. या प्रत्येक ढाब्याचे मालक वेगवेगळे आहेत; पण राजस्थानी जेवण मिळत असल्यानं त्यांचं नाव 'राजस्थानी ढाबा' असं पड़लं आहे.
राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश अशा अनेक ठिकाणांहून पुणे-बेंगळुरू महामार्गावर मालवाहू ट्रक दररोज मोठ्या संख्येनं रहदारी करतात. ट्रकचालकांच्या जेवणाची व्यवस्था हे ढाबे करतात. इतर हॉटेलांच्या तुलनेत अतिशय कमी किमतीमध्ये पोटभर जेवण मिळत असल्यानं हे चालकही या ढाब्यांवर विसावा घेऊन जेवण करून पुढं निघतात. कढईतली दाल, भट्टीवर खरपूस भाजलेली मैद्याची रोटी, सोबतीला ठसकेबाज पंजाबी भाजी आणि तडका मारलेला जीरा राइस, अस रुचकर जेवण इथं मिळतं. २५० ते ३०० रुपयांत इथं संपूर्ण जेवण मिळतं.
कसं जाल? :- पुण्याहून साताऱ्यापर्यंत दोन्ही बाजूला राजस्थानी ढाब्यांच साम्राज्य दिसतं. त्या पुढं कराडपर्यंत हे ढाबे फार नाहीत. पुण्यातून नसरापूर सोडलं, की कापूरहोळ, शिरवळ, खंबाटकी, वाई या परिसरांत हे ढाबे मोठ्या संख्येनें पाहायला मिळतात. इथल्या प्रत्येक ठिकाणची चव जवळपास सारखीच आहे.