Translate

Manus : 'मानुस' खऱ्या माणसाची जागा घेईल?

Manus : गेल्या आठवड्यात 'मानुस' नावाचा आभासी एआय एजंट एका चिनी कंपनीनं लाँच केला. जगातील पहिला 'पूर्ण स्वायत्त एआय एजंट' म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. आता त्याला 'मानुस' हे मराठमोळ नाव का देण्यात आलं असावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं नाव, वैशिष्ट्यं आणि मर्यादा याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या...


Manus : 'मानुस' खऱ्या माणसाची जागा घेईल?

Manus

कृत्रिम प्रज्ञेच्या वेगानं विकसित होत असलेल्या क्षेत्रात, या वर्षाच्या सुरुवातीलाच चीनच्या 'डिप सिक' नं दिलेल्या धक्क्यातून जग सावरत आहे. तोवर गेल्याच आठवड्यात चीनमधूनच या क्षेत्रातील अजून एक नवीन घोषणा करण्यात आली, त्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. बटरफ्लाय इफेक्ट या चिनी स्टार्टअपनं 'Manus' नावाचा आभासी एआय एजंट लाँच केला. जगातील पहिला 'पूर्ण स्वायत्त एआय एजंट' म्हणून 'Manus' चं वर्णन केलं जातं. पारंपरिक एआय चॅटबॉट्सच्या विपरित (जे प्रामुख्याने संभाषणात्मक परस्पर संवादासाठी डिझाइन केले आहेत), हे मानुससारखे एजंट्स वास्तविक-जगातील कार्यं स्वतंत्रपणे कार्यान्वित करण्यासाठी विकसित केलेले आहेत. हा फरक महत्त्वाचा आहे.

'एजंटिक एआय' ही संकल्पना नवीन नाही. चॅट जीपीटीचे पालक ओपन एआयसुद्धा छोट्या-छोट्या प्रमाणावर असे एआय एजंट्स बनवत होतेच. उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यात त्यांनी दाखवलेला 'ऑपरेटर', जो स्क्रीनवरील क्लिक स्वतः करू शकतो किंवा संशोधन करण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अनावरण केलेला 'डीप रिसर्च' एजंट वगैरे. पण 'मानुस' नं हा खेळ एक सर्वसमावेशक एजंट बाजारात आणून खूप वरच्या पातळीवर नेऊन ठेवलाय. पण त्याआधी 'मानुस' या नावाबद्दल थोडंसं !

हे जरूर वाचा:- Gold Rate Future India : बापरे सोन्याची लकाकी वाढली.

'Manus' हे नाव आपल्या मराठी मनाला कदाचित ओळखीचं वाटेल आणि चिनी लोकांनी 'काम करणारा माणूस' म्हणून हे मराठी नाव ठेवलं की, काय असं वाटू शकेल! पण मानुस हे नाव 'हात' या लॅटिन शब्दावरून आलंय. ते वापरकर्त्यांना कार्य पार पाडण्यात मदत करणारं साधन आहे. ही नामकरण निवड त्याची कार्यक्षमता अधोरेखित करते.



क्षमता आणि वैशिष्ट्यं (Manus)

मानुसची क्षमता त्याच्या वेबसाइटवर विस्तृतपणे दिलीय. अजूनही मानुस 'बीटा' टेस्टिंगमध्ये असल्यानं तो सर्वांना वापरता येत नाहीय. सध्या 'मानुस' चं अनावरण झाल्या-झाल्या केवळ सात दिवसांत २० लाख लोकांनी 'Manus' वापरायला द्या, म्हणून प्रतीक्षा यादीमध्ये नोंदणी केली आहे. पण तोपर्यंत त्यांच्या वेबसाइटवर 'Manus' काय-काय करू शकतो? याची दिलेली उदाहरणं पाहिली तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. एप्रिलमध्ये जपानचा दौरा आखून दे, टेस्ला शेअर्सचं सखोल विश्लेषण कर, विमा पॉलिसींचं तुलनात्मक विश्लेषण कर, मला व्यवसायासाठी कोण पुरवठादार चांगला आहे, त्याचा अभ्यास कर अशी अनेक कार्य 'मानुस' कशी करेल याचे व्हिडीओ वेबसाइटवर आहेत (वेबसाइट: www.manus.im). वेबसाइटवरील स्पेसेस गॅलरीमध्ये दर्शवल्याप्रमाणे, 'Manus' सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन अनुकूल ब्लॉग तयार करणं, हवामानबदल प्रभाव अहवाल तयार करणं आणि माइनक्राफ्ट शैलीतील खोल्या डिझाइन करणं यासारखी कार्य हाताळू शकतो.


चॅटजीपीटी आणि इतर एआय मॉडल्सची तुलना

'Manus' चं वेगळेपण समजून घेण्यासाठी, चॅटजीपीटीशी तुलना करणं बोधप्रद आहे. ओपन एआयद्वारे विकसित केलेलं चॅटजीपीटी हे एक मोठं लँग्वेज मॉडेल आहे, जे प्रामुख्यानं संभाषणात्मक परस्परसंवादासाठी, वापरकर्त्याच्या सूचनांवर आधारित मजकूर तयार करण्यासाठी डिझाइन केलं आहे. हे प्रश्नांची उत्तरं, निबंध लिहिणं किंवा माहिती प्रदान करण्यात उत्कृष्ट आहे, परंतु त्याची क्षमता मुख्यत्वे मजकूर निर्मितीपुरती मर्यादित आहे.

दुसरीकडे 'मानुस' स्वायत्तपणे कार्य करण्यासाठी अँथ्रोपिकच्या क्लॉड ३.५ सॉनेट आणि फाइन-ट्यून केलेल्या क्वेन (अलीबाबा कंपनीचं चिनी मॉडेल) आवृत्त्यांसह अनेक एआय मॉडेल्सचा लाभ घेतं. हा फरक लक्षणीय आहे. उदाहरणार्थ, आज तुम्हाला प्रवासाला निघायचं असेल चॅटजीपीटीला विचारून तुम्ही प्रवासाच्या शिफारशींची सूची तयार करू शकता, पण त्यानंतर तुम्हालाच ट्रॅव्हल एजंट अथवा विमान कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आरक्षण करावं लागतं, पण हा 'Manus' थेट आपल्यासाठी फ्लाइट बुक करू शकतो, हॉटेल्स आरक्षित करू शकतो आणि वापरकत्यांच्या पसंतीवर आधारित वैयक्तिक प्रवास योजना तयार करू शकतो, सर्व काही किमान सूचनांसह ! हे म्हणजे आपल्यासाठी काम करणारा 'सेक्रेटरी' च जणू! डिजिटल जगाशी संवाद साधण्याची 'मानुस' ची क्षमता त्याला 'डिजिटल कर्मचारी' म्हणून ठेवण्यासाठी तयार करू शकते. व्यवसायांसाठी ते ग्राहक सेवा किंवा बाजार संशोधन, खर्च कमी करणं आणि कार्यक्षमता वाढवणं यासारख्या प्रक्रिया स्वयंचलित करू शकतो. म्हणजे जिकडे कामासाठी खराखुरा माणूस ठेवणं परवडत नाही तिकडे हा एआय 'Manus' कमी खर्चात न थकता काम करायला ठेवता येऊ शकतो, असं म्हणता येईल.

'Manus' च्या संशोधकांनी चलाखपणे दुसरी चिनी कंपनी अलीबाबाच्या क्वेन या मॉडेल सोबतची केलेली भागीदारी हे फायदे आणखी वाढवू शकते, कारण 'क्वेन' हे 'डीप सिक' पेक्षा जास्त प्रभावी ओपन सोर्स चिनी मॉडेल आहे, त्यामुळे 'मानुस' वापरण्यास अधिक सुलभ होईल. तथापि, यामुळे एआयबाबत नेहमी असलेला आक्षेप 'माणसांच्या नोकऱ्या जातील' याबद्दल जास्त चिंता निर्माण होऊ शकेल. कारण एआय एजंट काही विशिष्ट भूमिकांमध्ये मानवी कामगारांची जागा घेऊ शकतात, म्हणून मानवाला पर्याय म्हणून नाही तर मानवाचा मित्र म्हणून आणि मानवी उत्पादकता वाढवायला एआय एजेंट कसे वापरता येतील याचं अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.

चीनची भूमिका आणि 'डीप सिक' क्षण

चीनमधूनच जानेवारी २०२५मध्ये जगजाहीर करण्यात आलेल्या 'डीप सिक' च्या यशानंतर एआय क्षेत्रातील अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या 'खर्चिक' मक्तेदारीला जोरदार हादरा बसला होता. ज्याचं वर्णन एआय विकासासाठी 'स्पुतनिक क्षण' म्हणून केलं गेलं. एआय संशोधनात चीनच्या गतीवर प्रकाश टाकणारा 'मानुस' अशाच आणखी एका क्षणाचं प्रतिनिधित्व करतो. ओपनएआय, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या अमेरिकन कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत चिनी तंत्रज्ञान कंपन्यांनी हे पाठोपाठ यश मिळवल्यानं चीनमध्ये संचारलेला उत्साह जागतिक पातळीवर एका नवीन बदलाचं प्रतिनिधित्व करतो. सिलिकॉन व्हॅलीच्या पलीकडे तांत्रिक नेतृत्वाचं वैविध्य यामुळे अधोरेखित झालं आहे.

शेवटी काय तर 'Manus' त्याच्या नवीनतम भागीदारी आणि स्वायत्त क्षमतांसह, एआय अनुप्रयोगांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. हे चीनसाठी आणखी एक 'डीप सिक' क्षण चिन्हांकित करतं, जे जागतिक एआय नवोपक्रमात नेतृत्व करण्याची क्षमता दर्शवतं. जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसे एआयमधील शक्ती संतुलन बदलू शकतं, नवीन संधी आणि आव्हानं येऊ शकतात. आत्तासाठी, 'मानुस' एजेंटिक एआयच्या परिवर्तनीय क्षमतेचा पुरावा म्हणून उभा आहे आणि माणसाला साथीदार म्हणून, सखा म्हणून साथ द्यायला विंगेत उभा आहे, असं म्हणता येईल!

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

Read Also:- 

1) Viral News : बापरे २४ तास सुरक्षा असलेल कोकणातील झाड, शंभर कोटींचं झाड तुम्ही कधी पाहिले आहे का ?


2) Lakshadweep Tour Places : 'लक्षद्वीप' - ‘गुगल सर्च’ मध्ये ट्रेडिंगमध्ये चर्चेत असणाऱ्या बेटाविषयी माहिती.


3) Highway Food : दाल-बाटी, सुक्क मटण आणि बरंच काही.. तर या हायवे फूडला एकदा नक्की भेट द्या!


4) dandpatta : लवलव करी धारदार पातं


5) top 10 patanjali products : पतंजलि के 10 गजब के प्रोडक्ट्स जो आपको जरूर ट्राय करने चाहिए.


6) The Future of AI and Machine Learning : Transformations, Challenges, and Opportunities


7) Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे? 



 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.