Translate

Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

Vantara Zoo'वनतारा' हे प्राण्यांचं संरक्षण आणि देखभालीसाठी उभारलेलं केंद्र आहे. अनंत अंबानी याचे संस्थापक आहेत. मानवाच्या दृष्टीने प्राण्यांचं संरक्षण का गरजेचं आहे, या विषयावर अनंत अंबानी यांनी सांगितलेली अद्भुत अविस्मरणीय विशेष माहिती. 


Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

Vantara Zoo

जामनगर येथे जगातील सर्वात मोठ तेल शुद्धीकरण केंद्र (रिफायनरी) आहे. परंतु हिरव्यागार शेतांच्या वाफ्यांनी बनलेली जणू गोधडी असावी, असं दिसणारं हे शहर म्हणजे प्रख्यात चित्रकार क्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या चित्रातलं ठिकाण वाटतं. एकीकड़े अरबी समुद्रावरून येणारे उष्ण वारे आणि दुसरीकडे कच्छच्या वाळवंटाचा कोरडेपणा यांचा अनुभव येथे येत असला, तरी जामनगरच्या पोटात मात्र अनेक आश्चर्य दडली आहेत. याच ठिकाणी अनंत अंबानी यांचं जवळजवळ तीन हजार एकर जंगलात पसरलेलं 'वनतारा' हे प्राणिसंरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे.

Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

जगातील सर्वांत मोठया आमराईतल्या झाडांवर रंगीबेरंगी चित्र रेखाटलेली दिसतात. त्यामुळे 'ॲलिस इन वंडरलँड' मधील झाडांचा भास होतो. त्याच वेळी चित्कारणारे हत्ती, रहस्यमय भासणारे सिंह, अजगर, तुंदिलतनू पाणघोडे आणि चपळ बकऱ्यादेखील येथे दिसतात. मृदुभाषी अनंत हळुवारपणे बोलत असतात. 'वनतारा' मध्ये येणाऱ्यांचे स्वागत करताना ते गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमध्ये सांगतात, 'येथे सेंद्रिय किटकनाशकांचा वापर होतो. त्यामुळे प्राण्यांना काहीही नुकसान होत नाही. नीलगाय इथे खेळत असते.'

Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

'वनतारा' ला पोहोचताच सागवानाचा दरवळ नाकात शिरतो, वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणाऱ्या वेली आणि जमिनीवर फुललेली झेंडूची फुलं लक्ष वेधून घेतात. शहरातून येणाऱ्यांचा थकवा निघून जातो आणि एखाद्या जादुई भूमीत पाऊल ठेवल्याचा भास होतो. येथे मांजर समाधानी आहेत, आनंदानं खेळताना दिसतात आणि मगरीही शांतपणे फिरत असतात. पण 'वनतारा' हे अतिशय आत्मीयतेचं ठिकाण आहे, कारण मनुष्यामुळे त्रास सहन करावा लागलेल्या प्राण्यांचं ते घर आहे.

हे जरूर वाचा:- fitness mantra : 'व्यायामाचं गणित' आणि 'घाम पुराण'.

Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

अनंत सांगतात, 'मी जगभरातील प्राण्यांची सुटका केली आहे. त्यांना सर्कशीत खेळ करण्यास भाग पाडले होते. लहानशा पिंजऱ्यांमध्ये ठेवून त्यांचा छळ करण्यात आला. काहींना पाठीवरून पर्यटकांना सफर घड़वायला, रस्त्यावर भीक मागायला लावले होते. अनेक प्राण्यांना गंभीर आजार होते. सर्कशीतल्या एका सिंहाला सिगारेटचे चटके देण्यात आले होते. एक हत्ती डोळ्याच्या दुखापतीमुळे आंधळा झाला होता. एक वाघ तर उपासमारीने एवढा खंगला होता की, त्याचा केवळ सांगाडा उरला होता. याशिवाय, संधिवाताचा गंभीर त्रास असलेल्या २०० हत्तींची सुटका करून आम्ही त्यांना इथे आणले. आता हे हत्ती इथल्या मऊशार हिरवळीवर फेरफटका मारत असतात. कॉँक्रीटच जंगल हा काही हत्तींचा नैसर्गिक अधिवास नव्हे. त्याला कित्येक मैल चालायला लावले, तर त्याचे सांधे निकामी होतील. स्वतःचं वजन सावरू न शकणाच्या प्राण्यांच्या वेदनांची कल्पना तरी करता येते का?'

अर्थात इथे फक्त गोंडस दिसणाऱ्या, कवटाळावंसं वाटणाऱ्या प्राण्यांवरच उपचार होतात, अस नाही. 'वनतारा' मध्ये एका बर्मीज अजगराच्या डोळ्यातील गळू शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकून, त्याला नवीन दृष्टी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पशुवैद्यक आणि प्राणीशास्रज्ञ आधुनिक विज्ञानाची कास धरून येथे कार्यरत आहेत. 'प्राणीमात्रांबद्दलची माझी ही आस्था अध्यात्मातून जन्माला आली आहे', असं अनंत अंबानी सांगतात. ते पुढे म्हणतात, 'प्राण्यांच्या अनेक प्रजाती भीषण वेगान अस्तंगत होत आहेत. अशा प्राण्यांना मला मदत करायची होती. माझ्या वडिलांनी मला मोठ पाठबळ दिलं. ते म्हणाले, 'समाजाचं देणं समाजाला परत देता येईल, असं काहीतरी करू या.' प्राण्यांच रक्षण करणं हे असंच कार्य आहे. प्राण्यांमध्येही देव आहे. देवत्व दिसत नाही, परंतु देवानं निर्माण केलेले प्राणी आपल्या आजुबाजूला आहेत.'

अर्थात, या मार्गात अनेक आव्हानंही आहेत. अनंत अंबानी सांगतात, 'भारतातील पशुवैद्यकिय डॉक्टरांपैकी फार कमी जणांना वन्यजीवांच्या औषधोपचारांचं ज्ञान होतं. बहुतेकांना केवळ कुत्रे आणि मांजरींवरील उपचारांचा अनुभव होता, परंतु वाघांवरील उपचाराचं ज्ञान नव्हतं. त्यामुळे आम्ही 'वनतारा' मध्ये हे कौशल्य विकसित केलं. जागतिक पातळीवरील तज्ज्ञांना पाचारण करून भारतीयांना प्रशिक्षण देण्यात आलं. येथे काम करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ या सगळ्यांचा शोध घेतला. भारतात सर्कशीत प्राण्यांचा वापर करण्यावर बंदी आहे. प्राण्यांच्या कल्याणाबाबत भारत आघाडीवर असावा, हे माझं स्वप्न आहे.

Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

वन्यजीव हाताळण्यासाठी भारतात आणि परदेशातही अनेक निकष निश्चित केले आहेत. आम्ही या सर्व नियमांच पालन करतो. 'वनतारा' चं काम पाहण्यासाठी १२ वकिलांची फौज आहे. कधीकधी असंही म्हटलं जात की, आम्ही हे मनोरंजनासाठी करत आहोत किंवा प्राणिसंग्रहालय चालवत आहोत. पण, प्राणिसंग्रहालय या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. माणसांच्या मनोरंजनासाठी प्राणी पाळणं ही जुनी विचारसरणी आहे. माझ्या दृष्टीनं, प्राण्यांचे हक्क सर्वाधिक महत्वाचे आहेत. 'वनतारा' हे प्राण्यांचं संवर्धन, पुनर्वसन आणि संशोधन केंद्र आहे. हे प्रदर्शन क्षेत्र किंवा प्राणिसंग्रहालय नाही. हे सेवा केंद्र आहे. देवानं निर्मिलेल्या प्राण्यांची सेवा करण्याचं स्थान. विविध प्रजाती लूप्त होण्याच्या संकटाबद्दल आपण जाणून घेतल पाहिजे. काय करता येईल, याचा अभ्यास केला पाहिजे. नामशेष होणाऱ्या प्रजाती वाचवण्यासाठी अधिक सजग राहिलं पाहिजे, जंगलतोडीला आळा घालण्यापासून ते वन विभागाला सहकार्य करण्यापर्यंत सर्व केलं पाहिजे. यासाठी अभ्यासक्रम असायला हवा, प्राण्यांबद्दलची आवड आणि ममता हवी. आम्ही येथे काय काम करतो आणि का करतो, हे लोकांनी समजून घ्यावं, असं मला वाटतं.'

जगातील सर्वात आधुनिक हत्ती रुग्णालय (Vantara Zoo)


Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

जखमी वन्यजीवांसाठी 'वनतारा' येथे रुग्णवाहिका आणि विशेष क्रेन उपलब्थ आहे. येथे अनेक उपचार उपलब्ध आहेत. हत्ती येथे सुगंधी मुलतानी मातीत खेळतात, त्यामुळे त्यांच्या जखमा बऱ्या होतात. याच्या जोडीलाच जलोपचार (हायड्रोथेरपी) तलाव आणि जंबो जकूझीदेखील येथे आहे. उपचार, शस्त्रक्रिया, लेसर, acupuncture आणि हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीही येथे देता येतं. भाजलेल्या अवस्थेत येथे आणलेल्या लीलावती नावाच्या हत्तीला येथे ऑक्सिजन थेरपीनं नवीन जीवन मिळाले.

'प्राणीच आपल्याला माणूस बनवतात' (Vantara Zoo)


Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

'वनतारा येथे हत्ती काठियावाडी उपचार केंद्रात नाचणीचे लाडू, खिचडी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या २४ प्रकारच्या सेंद्रिय गवताचा आस्वाद घेतात. उंच वृक्षांमधून भटकंती करतात आणि छोट्या रोपट्यांवर पाऊल पडणार नाही याची काळजी घेत मार्गक्रमण करतात. 'वनतारा' मधील हे जखमी प्राणीच आपल्याला मानव बनवतात', अशी भावना अनंत व्यक्त करतात.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

Read Also:- 

1) Viral News : बापरे २४ तास सुरक्षा असलेल कोकणातील झाड, शंभर कोटींचं झाड तुम्ही कधी पाहिले आहे का ?


2) OpenAI's Secret Weapon: Is Q-Star Humanity's Last Stand : ओपनएआई का गुप्त हथियार: क्या क्यू-स्टार मानवता के लिए खतरा है?


3) Lakshadweep Tour Places : 'लक्षद्वीप' - ‘गुगल सर्च’ मध्ये ट्रेडिंगमध्ये चर्चेत असणाऱ्या बेटाविषयी माहिती.


4) Highway Food : दाल-बाटी, सुक्क मटण आणि बरंच काही.. तर या हायवे फूडला एकदा नक्की भेट द्या!


5) dandpatta : लवलव करी धारदार पातं


6) top 10 patanjali products : पतंजलि के 10 गजब के प्रोडक्ट्स जो आपको जरूर ट्राय करने चाहिए.


7) IT Hub in Bangalore : काचेच्या कडेकोट भिंतीआड...


8) Top Tips for Buying a New Car - Avoid These Common Mistakes : नवीन कार घरी आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे? PDI टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.