fitness mantra
1) व्यायामाचं गणित : तरुणांमध्ये व्यायामाबद्दल जेवढी जागरूकता आहे तेवढेच गैरसमजही आहेत. त्यामुळे व्यायाम कमी केल्याने होणाऱ्या त्रासांपेक्षा अति किंवा चुकीच्या व्यायामामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचं प्रमाण वाढू लागलं आहे, अशावेळी चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाचं गणित नीट समजून घेण आवश्यक आहे.
2) घाम पुराण : शरीरातून विष्ठा, लघवी जशी बाहेर पडते, तसाच घाम बाहेर निघण आवश्यक आहे. बाहेरच्या उकाड्याने किंवा शरीरात वाढलेल्या तापमानामुळे त्रस्तता आली की, शरीराबाहेर पडलेला घाम खरंतर दिलासा देणारा असतो. शरीरामध्ये थंडावा टिकवण्यासाठीची ती एक नैसर्गिक यंत्रणाच असते.
वरील 2 topics विषयी या आर्टिकल मध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेवूया.
fitness mantra
1) व्यायामाचं गणित
व्यायामाचा भूलभुलैया
व्यायामाबद्दल तरुण पिढीत जेवढी जागरूकता वाढली आहे तेवढेच गैरसमजही आहेत. त्यामुळे व्यायाम कमी केल्याने होणाऱ्या त्रासांपेक्षा अति किंवा चुकीच्या व्यायामामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचं प्रमाण वाढू लागलं आहे, त्यामुळे खालील गोष्टी लक्षात ठेवा:-
* जेवणानंतर केलेला व्यायाम आणि धावपळ सांध्यांची दुखणी निर्माण करतो.
* एसीमध्ये केलेला व्यायाम वजन कमी होण्याचा फायदा देण्यात उशीर करतो.
* रात्री उशीरा केलेला व्यायाम झोपेची लय बिघडवतो.
* प्रदूषणयुक्त रस्त्यांवर धावल्याने श्वसनक्षमता कमी होऊ शकते.
* शक्तीच्या पलिकड़े केलेला व्यायाम मोठे आजार निर्माण करतो.
* व्यायाम करत असताना जेवणात सिग्थ पदार्थाचा (घरी बनवलेलं साजूक तूप, ताक, हिरवे मूग,
शिंगाडा, सालीसकट डाळी) अभाव असेल तर थकवा येतो.
व्यायाम करताना हे तपासून पाहा
* दिवसभर स्फूर्ति आणि उत्साह टिकतो.* मांसपेशी तसंच सांध्यांचं आरोग्य उत्तम राहतं.
* जंक फूड खाण्याची इच्छा कमी होते.
* मन प्रसन्न राहतं.
* पचनक्षमता सुधारते.
* वजन नियंत्रणात राहतं.
* प्रतिकारक्षमता वाढते.
असे अनेक बदल व्यायामामुळे होऊ लागतात. मात्र, या लक्षणांच्या विरोधी लक्षण दिसत असतील तर व्यायामाची पद्धत तपासण अत्यावश्यक आहे.
व्यायामाचे फायदे ( fitness mantra )
* हृदय तसंच श्वसन आणि रक्त संवहन संस्थांच आरोग्य सुधारत.* संपूर्ण शरीराला स्थैर्य लाभत आणि मन एकाग्र होऊ लागतं.
* शांत झोप लागते.
* शरीर सौष्ठव चांगल राहतं.
व्यायामाचे साधे व सोपे नियम
* व्यायाम करताना आपल्या शक्तीच्या अर्धीच शक्ती खर्च करावी. संपूर्ण थकवा येईपर्यंत व्यायाम करण शक्यतो टाळावं.* व्यायाम करताना आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवावं. तसंच '१८०- आपलं वय-हृदयाचे आदर्श ठोके' हे समीकरण लक्षात ठेवावं. म्हणजे तुमचं वय 3० वर्षाचं असेल तर साधारण १५० पर्यंत ( १८०-३० = १५० ) हदयाचे ठोके असतील तर त्या तालावर व्यायाम होऊ शकतो. परंतु, तुमच वय ५० वर्ष असेल तर १३० पेक्षा अधिक ठोके वाढणं त्रासदायक ठरू शकतं.
* व्यायाम करताना घोट-घोट पाणी पिऊ शकता. परंतु उभ्या-उभ्या खूप जास्त पाणी प्यायल्यास त्रास होतो.
* व्यायामानंतर लगेचच खुप खाऊ-पिऊ नये. श्वास नैसर्गिक झाल्यावर बसून पाणी प्यावं. तसंच योग्य आहार घ्यावा.
* रताळं, डाळिंब, स्थानिक तसंच मोसमी फळं अशा गोष्टी खाण चांगलं असतं.
* सुती कपडे किंवा घाम अंगावर रेंगाळ न देणारे कपड़े घालावेत. सैलसर कपडे फायदेशीर ठरतात.
* व्यायाम करताना विशेषतः श्वासाकड़े लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. धाप लागत असेल तर थोड थांबून पुन्हा व्यायामाला सुरुवात करावी.
* मुलांना व्यायामाचे प्रकार सांगताना त्यांची चण व कुवत यांचा विचार करावा.
* स्पर्धांसाठी व्यायाम करताना शरीराबरोबर मनाची तयारीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते.
* व्यायाम करताना वजन नियंत्रणात आणण्याचा उद्देश असेल तर तज्ज्ञांकड़ून व्यायामाचे प्रकार माहित करून घेणं केव्हाही चांगलं. स्वतःच्या मनाने सरसकट व्यायाम करू नये.
* व्यायामापूर्वी अंगाला तिळाचं किंवा खोबऱ्याचं तेल कोमट करून चोळून लावावं, व्यायाम झाल्यावर कोरड बेसन तसंच मसुर डाळीच पीठ, चंदन, वाळा, हळद यांच एकत्रित कोरड चूर्ण संपूर्ण अंगाला चोळून लावावं आणि त्यानंतर आंघोळ करावी. पोटावर, नितंबावर साठलेली चरबी कमी करण्यासाठी हे चूर्ण उपयोगी पडतं.
* व्यायामानंतर योग्य विश्रांतीलाही तितकंच महत्त्व द्यायला हवं.
गर्भधारणा आणि व्यायाम
संपूर्ण वर्षभरात कार्तिक आणि मार्गशीर्ष हा काळ (नोव्हेंबर-डिसेंबर) शरीराला सर्वाधिक ताकद देतो. शरीर आणि मनाच्या क्षमता यावेळी सर्वाधिक चांगल्या असतात. त्यामुळे विवाहित जोडप्याने या कालावधीत बाळाच नियोजन केल तर फायदेशीर ठरू शकतं. गर्भारपणापूर्वी जस फॉलिक acid आणि 'ब', ड' जीवनसत्त्व यांचा वापर उपयुक्त ठरतो; तसंच उभयता पती-पत्नीचं वजन नियंत्रणात असणही तेवढंच महत्त्वाच आहे. विशेषतः स्त्रीच्या कंबर आणि नितंबाच्या घेराचं प्रमाण योग्य असेल तर होणारं बाळ अधिक आरोग्यवान होतं. त्यामुळे खाण्याबरोबरच व्यायामाचंही नीट नियोजन करायला हवं. गर्भारपणातही तज्ज्ञांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली योगसाधना आणि व्यायाम सुरू ठेवता येतो.वार्धक्य आणि व्यायाम
व्यायामाने आपलं म्हातारपण दूर राहतं. तसंच म्हातारपणात केलेला व्यायाम शरीर-मनाचं आरोग्य टिकवून ठेवतो. शरीराच्या जाणीवपूर्वक हालचाली या सांध्यांच्या मांसपेशींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. तर एकाच जागी जास्त बसल्याने तसंच दिवसा प्रमाणाबाहेर झोपल्यास पचनाचे आजार वाढतात. त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार, मूळव्याध असेही आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्यायामाचा कंटाळा करू नये.व्यायाम एक उपाय
मान, पाठ, कमरेच दुखण असल्यास ठराविक व्यायाम केल्यावर बरं वाटतं. मासिक पाळीसंबंधी आजार असेल तर अनेक योगिक क्रिया (चक्की चलानासन, तितली आसन, पश्चिमोत्तानासन, योगमुद्रा, विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासान, ब्रह्ममुद्रा, सिंहमुद्रा इ.) उपयोगी पडतात.स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य तो व्यायाम करावा. एकदा का व्यायामाच गणित जमलं की, आजारांची वजाबाकी आणि आरोग्याची बेरीज चांगली जमेल, हे मात्र नक्की!
2) 'घाम' पुराण
घामाच शास्त्र
शरीरातून विष्ठा, लघवी जशी बाहेर पडते, तसाच घाम बाहेर निघण आवश्यक आहे. बाहेरच्या उकाड्याने किंवा शरीरात वाढलेल्या तापमानामुळे त्रस्तता आली की, शरीराबाहेर पडलेला घाम खरंतर दिलासा देणारा असतो. शरीरामध्ये थंडावा टिकवण्यासाठीची ती एक नैसर्गिक व्यवस्थाच असते. शरीराची स्वतःची एक प्रकृती असते. त्याप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे घाम येतो.पित्तप्रकृतीच्या व्यक्ती (गोऱ्यापान, घाऱ्या किंवा वेगळ्या रंगाच्या डोळ्यांच्या तसंच हुषार पण रागीट, भूक सहन न होणाऱ्या इत्यादी) घामाने चिंब भिजून जातात. कारण त्यांना घाम जास्त येतो. घाम खुप जास्त येणं किंवा अजिबातच न येण अशी ही दोन्हीं टोक आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. म्हणून पुढील तक्रारी नीट तपासून पाहणं आवश्यक आहे.
* घाम जास्त येण.
* तळहाताला खुप घाम येण. त्यामुळे हातातून वस्तू निसटण.
* डोक्याला खुप घाम येण त्यातून केसगळतीचा त्रास उद्भवण.
* काखा किंवा बगलेत घामाला दुर्गंधी येण.
* अंगाला खाज येण.
* घामाच्या धारा लागण.
* घाम कमी होणं
* त्वचा खूप कोरडी होण.
* केस गळण.
* स्पर्शज्ञानात कमीपणा येणं.
* शरीराची तसंच तळपायाची आग होणं.
शरीरात ओलावा निर्माण करणारा हा घाम त्वचेला एक सुकुमारता/मऊपणाही देतो. घाम हे शरीराला एक वरदान आहे.
घाम जबरदस्तीने रोखला तर...
शरीरातून बाहेर पडू पाहणारा हा मल फार चांगला अनुभव देत नाही; घामाने थकवा येतो, मन अप्रसन्न होतं, चिकचिकाट नकोसा होतो आणि काम करण्याचा उत्साहसुद्धा कमी होऊ लागलो; अशा एक ना अनेक गैरसमजामूळे व्यायामानंतर येणारा सहज -सुलभ घामही रोखला जातो. सध्या वातानुकूलित व्यायामशाळेत व्यायाम करण्याचा कल वाढू लागला आहे. परंतु अशाप्रकारे कृत्रिमरीत्या घाम रोखण्याने उलट त्वचेचा कोरडेपणा वाढतो, चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात तसंच त्वचेचे विकारही होऊ शकतात. अशा विविध गोष्टींमुळे अकाली म्हातारपणाचे त्रास निर्माण होऊ शकतात.खालील गोष्टींचा नक्की विचार करा ( fitness mantra )
खूप काळ एसीमध्ये बसण, एसीतून अचानक बाहेर येण तसच थंड हवेच्या ठिकाणातून खूप उकाडा असलेल्या प्रदेशात सततचा प्रवास करण आणि एकूण तापमानात तीव्र बदल होईल अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात.'ड' जीवनसत्वाची कमतरता
'ड' जीवनसत्त्व सूर्यकिरणांतून मिळतं. या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हाडांचा ठिसूळपणा, अंगदुखीचा त्रास आणि पोटाचा घेर वाढणं तसंच निराशा येणं व जीवनसत्त्वाचं शरीरामध्ये शोषण न होणं अशी विविध लक्षणं दिसू शकतात. घर, ऑफिस तसंच गाड्यांमधल्या बंदिस्त वातावरणात वातानुकूलनाचा अतिरेकी वापर हे त्यामगचं एक महत्त्वाचं कारण आहै.राजा-राणीला घाम हवा
खूप वर्षापूर्वी एक बालनाट्य आलं होतं. ते नाटक आजच्या काळात अगदी तात्पर्यासह लागू होतं. राजा-राणीला होणाऱ्या आजारांचं निदान तेव्हा त्यामध्ये वैद्यानी असं केलं होतं की, व्यायामाचा अभाव, आळस, बैठ काम आणि राजमहालातच राहण यामुळे राजा व राणी दोघंही एकसारखे आजारी पडतात. परिणामी, त्यांचं नातं बिघडत असून दोघांनाही नैराश्य येऊ लागलं आहे. तेव्हा त्यांना घाम यायला हवा. त्यातून परिस्थितीत बदल होऊ शकतो.आजकाल, तरुण पिढीत वाढणारे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह तसंच मानसिक आजारांच कारणही बालनाट्यातल्या राजा-राणीशी बऱ्यापैकी मिळत-जुळत आहे. त्यावर उपायही आहे आणि तो म्हणजे घाम यायला हवा!
व्यायाम आणि घाम
घाम येईपर्यंत व्यायाम करायला हवा. ही एक सूचना आहे. अशावेळी घामच रोखला तर व्यायामाची मर्यादाच समजणार नाही.वजन कमी करण्यासाठी 'मेदस्विता'- चयापचय ( मेटाबॉलिजम ) नीट व्हायला हवं, त्यासाठी योग्य प्रमाणात घाम येण आवश्यक आहे.
अतिव्यायाम करणं किंवा व्यायाम अजिबातच न करण तसंच दिवसा झोपण, जास्त चिंता करण, राग, चिडचिड व संताप होण आदीमुळे घामाच गणित बिघडत.
घाम - एक सूचना
नुकताच आपण जागतिक मेनोपॉज दिवस साजरा केला. अचानक येणाऱ्या घामाच्या धारा हे रजोनिवृत्तीच लक्षण अशू शकतं. त्यासाठी ही सूचना लक्षात घेऊन आपल्या दैनंदिनीत बदल करायला हवा. तसंच हृदयविकार आणि हृदयाच्या मांसपेशींना योग्य रक्तपुरवठा न होणं यामुळे दरदरून घाम फुटतो. हेदेखील महत्वाच लक्षण असून त्याकडे दुर्लक्ष करू नये. शिवाय, अति मेदस्विता तसंच मानसिक आजारांमळे येणाऱ्या घामाने शरीर निथळत. त्यामुळे वेळीच जागृत होण्याची गरज आहे. प्रकृतीमुळे येणारा घाम आणि विकृतीमुळे फुटलेला घाम यातला फरक समजून घ्यायला हवा. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन घ्याव आणि त्यांच्याकडून समस्यांच निदानही करवून घ्यावं.घाम हाच इलाज ( fitness mantra )
ताप जास्त झाला तर अंगावर पांघरूण घेतल्याने घामावाटे तो बाहेर पडतो. त्याचं नियोजन होत. जाड़ेपणावरही असाच इलाज आहे. कफ विरघळवणारा 'स्वेदन' हा स्वतःच एक इलाज आहे. तरीही घामाच्या दुर्गंधीपासून हैराण असाल तर सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यामद्धे खालील गोष्टी करा.* मैद्याचे, तिखट-तेलकट, शिळे पदार्थ खाणं टाळा. सुती कपडे वापरा.
* धणे, जिरं आणि पाणी तसंच षडंगोदक (मुस्ता, पर्पट, वाळा-दोन प्रकार, चंदन, सुंठ अशा एकूण सहा प्रकारच्या औषधींचं पाणी) प्यावं, पाण्याचं योग्य प्रमाण राखावं,
* रक्तमोक्षण, विरेचन अशी पंचकर्म करावीत.
* निसर्गाशी असलेलं नातं जपावं. उन्हाचं आनंदाने स्वागत करावं.
* चंदन आदी सुगंधी लेप लावावेत.
* सुगंधी उटण्याने आंघोळ करावी.