dandpatta : दांडपट्टा या शस्त्राला शिवरायांच्या काळापासूनचा इतिहास आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य सरकारने दांडपट्टयास 'राज्यशस्त्र' म्हणून मान्यता दिली. या निमित्ताने उलगडलेला इतिहास...
dandpatta (दांडपट्टा)
मध्ययुगीन काळात पृथ्वीराज चौहान, महाराणाप्रताप, विजयनगरचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज अशा योध्यांनी पराक्रम गाजवले. या योद्ध्यांची शस्त्रेही प्रसिद्ध आहेत. शस्त्रांमुळे योद्धा आणि योद्ध्यामुळे विशिष्ट शस्त्र प्रसिद्ध झाल्याची अनेक उदाहरणे अगदी वैदिक काळ, रामायण-महाभारत काळापासून ते मध्ययुगापर्यंत दिसतात. मध्ययुगातील योद्धेही शस्त्रांसह नावाजलेले होते. महाराणाप्रताप यांचा भाला आणि खड़ग, पृथ्वीराज चौहान यांचे धनुष्य विख्यात आहे. या योध्यांत 'योद्धाराजा' असे ज्यांस म्हणता येईल ते 'श्रीमंतयोगी' म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे अग्रस्थानी आहेत.
इसे जरूर पढ़ें:- Which is the cheapest country to travel outside India? : विदेशी पर्यटन स्थळ (Budget Friendly) ज्यांची आपल्याला कल्पना पण नाही!
शिवभारताच्या दहाव्या अध्यायाच्या ३७व्या श्लोकात...
'मराठ्यांच्या या तलवारी (म्हणजे पट्टे ) कोप्तागिरी करून सोन्याने नक्षीकाम करून मढवलेल्या आहेत. त्यावर सौंदर्यपूर्वक फारशी कलाकृती नसली तरीही त्या अत्यंत घातक शत्रूला भेदून टाकणाऱ्या आहेत. घोड़ेस्वार देखील या शस्त्राच्या सहाय्याने दोन्ही बाजूच्या शत्रूला कापून काढू शकतो. याचे पाते (blade) थोडे लवचिक कठोर किंवा प्रतिरोधक आहे. जर हे कशावर आदळले तर ते फक्त वाकते. पात्याची लांबी १२० सेमी. ते १५० सेमी. असू शकते. खांद्यापासून मनगटाच्या स्नायूंच्या हालचालीने पट्टा चालविला जातो. त्याचा वार कोणत्याही दिशेने, कोणत्याही कोनात वितरीत होऊ शकतो. पट्ट्याच्या प्रहाराची शक्ती विलक्षण असते', असे ते म्हणतात.
सतराव्या शतकात मराठेशाहीच्या काळात या शस्त्राचा जास्त संबंध आलेला दिसतो. युरोपात उत्कृष्ट पोलादाची पाती (blades) बनत असत. ती येथे आयात केली जात. युरोपातून व्यापारी समुद्रमार्गे विक्रीसाठी भारतात अनेक वस्तुंबरोबर पोलाद आणि पोलादाची तयार पाती आणत असत. ही पाती दक्षिणेतील शस्त्रांसाठी बऱ्याच प्रमाणात वापरात होती. भारतातील लोहारही भारतीय पोलादाची शस्त्रे बनविण्यात वाकबगार होते.
शिवाजी महाराजांची 'भवानी तलवार' विख्यात आहे. 'तुळजा फिरंग', 'जगदंबा तलवार' या तलवारीही प्रख्यात आहेत. चित्रगुप्ताच्या बखरीत महाराजांच्या गुरगुजाचे (गुर्ज-गदेसारखे शस्त्र ) नाव 'शंभूप्रसाद' नावाने नमूद केलेले आहे. वाघनखे आणि बिचवा यांनी घडवलेला शिवप्रताप सर्वज्ञात आहे. वाघनखांचा उल्लेख झाला की शिवछत्रपतीच आठवतात. शिवाजी महाराजांचा पट्टा 'यशवंत' नावाने प्रसिद्ध होता. पट्टा हे मराठ्यांचे आवडते शस्त्र. पट्टेकऱ्याला 'पटाईत' असे म्हणत. एक पटाईत दहा धारकऱ्यांना भारी पड़े. मराठा योद्धा दोन्ही हातांत दोन पट्टे चढवून युद्धाला उतरत असे. असेच पट्टे हाती चढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढ़वली. स्वतः शिवराय पट्टा घेऊन युद्धात उतरल्याच्या नोंदी बखरीत आढळतात. कवींद्र परमानंदांनी शिवभारतात तसे वर्णन केलेले आहे.
आरोहणे प्रतरणे चंक्रमे च विघंलने कृपाणचापचक्रेषु प्रासपट्टीशशक्तिषु... असे नमूद आहे.
प्रतापगडाखाली अफजलखानास मारला त्या प्रसंगी प्रभावी शस्त्र म्हणून पट्ट्याचा वापर झाल्याचा विशेष उल्लेख आवर्जून केलेला आहे.
शिवभारतात अध्याय २१च्या श्लोकात...
कृपाणं पाणीनैकेन बिभ्राणोन्येन पट्टीशम्... म्हणजेच 'एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात पट्टा धारण करणारा शिवाजी राजा', असे वर्णन आहे.
कृपाणं पाणीनैकेन बिभ्राणोन्येन पट्टीशम्... म्हणजेच 'एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात पट्टा धारण करणारा शिवाजी राजा', असे वर्णन आहे.
शहाजी राजांच्या काळात खंडागळे हत्ती प्रकरणात झालेल्या लढ़ाईत वीर दत्ताजी पट्टा घेऊन लढल्याचे वर्णन 'शिवभारत' च्या तिसऱ्या अध्यायात परमानंद यांनी केलेले आहे. तसेच चौध्या अध्यायात, भातवडीचे रणांगण शहाजी राजांनी जिंकले होते व त्या युद्धात पट्टाही होता, असे नमूद आहे.
शिवकालीन बखरींचा विचार करता 'सभासद बखर' ही आद्य बखर आहे. 'चिटणीस बखर', '९१ कलमी बखर', 'चित्रगुप्ताची बखर' आणि इतर अनेक बखरीमध्ये युद्धप्रसंगांत शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने पट्टा शस्त्र वापरल्याचे नमूद केले आहे. कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. प्रतापगड यद्धाच्या वर्णनात सभासद म्हणतो, 'राजीयांनी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात चालविला. दुसरे हातचे बिचवियाचा मारा चालविला. संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले खानाचे डोचके कापिले. ते हाती घेवून राजिया जवळ आला. इतिकीयात सैद बडा पटाईत धाविला. त्याने राजे जवळ केले. पट्याचे वार राजियावरी चालविले. तो राजियाने जिऊ महालियावजवळ हूद्दियाचा पट्टा होता तो घेवून पट्टा व बिचवा असे कातर करून सैद बडा याचे चार वार वोढीले. पाचवे हाताने राजियास मारावे तो इतिकीयात जिऊ महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैदबडायासी वार केला. तो पट्टीयाच हात हत्यारा समेत तोडीला'.
इ.स.१७६१ च्या तिसऱ्या पानिपतच्या लढाईत मराठा फौजांनी वापरलेल्या शस्त्रास्त्रांचे वर्णन येते. पानिपतच्या युद्धाआधी सदाशिवराव भाऊंची लढाई निजामाविरूद्ध झाली होती. उदगीरच्या किल्ल्यावर त्यांनी स्वारी केली. ताज अली शहाच्या तुझुक-ए-अशफिया हस्तलिखितात त्याचे उत्कृष्ट चित्र काढलेले आहे. यात मध्यभागी नानासाहेब पेशवा, विश्वासराव, इब्राहीमखान गारदी आणि सदाशिवराव भाऊ हे हत्तींच्या मागे दाखवले आहेत. या हत्तींच्या सोंडेत मोठे पट्टे अडकवलेले दाखवले आहेत.
पानिपतच्या बखरीत पट्ट्याच्या नोंदी मिळतात. मराठा सैन्यात कोणकोणती शस्त्रे होती याची यादीच रघुनाथ यादव देतो. 'मौक्तीकाच्या माळा घातल्या कटीबंद पेट्या मोतिलग कमर खचोन बाघोन पटे रुमे जनबी घेतले...' यातील पटे 'रुमे' आणि 'जनबी' असे जे आले आहे त्याचा अर्थ, 'रुमे' म्हणजे रोमन आणि 'जनबी' म्हणजे जिनिव्हा (इटली) होय. मराठ्यांच्या पट्टयाना पाने प्रसिद्ध परदेशी कंपन्यांच्या उकृष्ट पोलादाची असत हे लक्षवेधी आहे. पट्टा हे शस्त्र मराठा सैन्यात फार प्राचीन काळापासून उपयोगात होते. शत्रूला भेदणारी, मात्र शत्रूला कमी परिचयाची असणारी अशी अद्भुत ताकदीची शस्त्रे महाराजांनी चाणाक्षतेने ओळखली अणि मराठा सैन्यात रूढ़ केली. पट्टा हे त्यांचे आवडते शस्त्र होते. त्यांच्या विश्वासाह चित्रांतून एका हातात पट्टा आवर्जून दिसतो.
पट्ट्याची विविध अंगे (dandpatta)
मूठ आणि पाते ही पट्टयाची मुख्य अंगे असली तरीही त्यांची उपांगे आहेत. मुठीला 'खोबळा' असे म्हणतात. तिला मागे 'दस्तान' (संरक्षक कवच) जोडलेले असते. पट्टा धरलेल्या हाताच्या मुठीला कोपरापर्यंत संरक्षण मिळते. पाच फुटावरील शत्रूला गारद करण्याची ताकद पट्टेकऱ्याला साधत असे.
शिवरायांकडून वापर (dandpatta)
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे 'विटसन अल्बम' मध्ये आहेत. या चित्रांत शिवाजी महाराजांच्या हातात पट्टा दाखवलेला आहे. त्यावर सुवर्णाचे नक्षीकाम आहे. आणखी एक चित्र ब्रिटिश संग्रहालयात आहे. त्यातील पट्टा 'वराहमुखी' खोबळा असलेला आहे. निकोलाव मानुचीने देखील शिवाजी महाराजांचे एक चित्र काढून घेतले होते. त्याच्या 'स्तोरीया दि मोगोर' या पुस्तकात ते आहे. त्यात शिवाजी महाराजांच्या हातातील पट्टा सोन्याने मढविलेला असून तो रत्नजडित आहै.
इ. स. १८२७ मध्ये कॅप्टन मुंडी भारत भेटीला आला होता. त्याच्या लेखनात पट्याविषयी उल्लेख आढळतात. पट्याचे प्रात्यक्षिक पाहिल्याचे त्यांनी नमूद केलेले आढळते. 'दांडपट्टा हा तलवारीसारखाच; परंतु त्याला सुमारे पाच फूट लांबीची पात आहे. पट्टा प्रथमच पाहणारे हे परदेशी लोक तलवारबाजाच्या हातातील भयंकर शस्त्र असा त्याचा उल्लेख करतात. हे शस्त्रइतके भयंकर आहे की एखाद्या बैलाची मान देखील तोडता येईल', असे तो म्हणतो.
तो लिहितो, 'मराठ्यांनी विकसित केलेली आणखी एक वैशिष्टयपूर्ण तलवार असामान्य आहे. त्या तलवारीला ते पट्टा म्हणतात. या तलवारीला (Gauntlet Hilt) खोपडीसारखी मूठ आहे. तिला लांब नळकांड्यासारखा भाग जोडलेला आहे. हा भाग दस्तानसारखाच असून त्याला असलेली अर्धचंद्राकृती कडी हाताला पक्कड बसविणारी असते. अशी ही खोबळेदार मूठ तलवारींच्या इतर मुठींमध्ये अद्वितीय आहे. ही मूठ योद्ध्याच्या हाताला कोपरापर्यंत झाकते. आत हाताची मूठ आणि कोपरापर्यंत व्यवस्थित बसेल असा हा खोबळा आहे. उत्कृष्ट तलवारबाजाशिवाय इतरांना पट्टा चालवणे कठीण आहे.
dandpatta
जी. सी. स्टोन हा भारतीय शस्त्रांचा अभ्यासक होता. पट्टा या शस्त्राची उत्पती कट्यारीपासून झाल्याचे तो सांगतो. विजयनगर कट्यारीला 'जामदाडू' आणि त्याच मोठया कट्यारीला 'बाराजामदाडू' म्हणतात. त्यापासून पट्टा तयार झाला असे तो म्हणतो.
तत्कालीन मराठा सैन्य पंधराव्या शतकापासून परंपरेने पट्टा हे शस्त्र वापरत असे. त्या शस्त्रावर त्यांचा अधिकारच होता. त्यांनी सतत चार शतके पट्टा वापरल्याचे उल्लेख ऐतिहासिक साधनांतून येतो. आजही महाराष्ट्रात दांडपट्टा आणि त्याचे मर्दानी खेळ जिवंत आहेत. अशा रीतीने dandpatta हे महाराष्ट्राचे पारंपारिक शस्त्र आहे. राज्यातील सरकारने या शस्त्रास 'राज्यशस्त्रा' चा मान देऊन ही परंपरा जपली आहे.
Read Also:-
1) Viral News : बापरे २४ तास सुरक्षा असलेल कोकणातील झाड, शंभर कोटींचं झाड तुम्ही कधी पाहिले आहे का ?
3) Highway Food : दाल-बाटी, सुक्क मटण आणि बरंच काही.. तर या हायवे फूडला एकदा नक्की भेट द्या!
5) top 10 patanjali products : पतंजलि के 10 गजब के प्रोडक्ट्स जो आपको जरूर ट्राय करने चाहिए.
7) IT Hub in Bangalore : काचेच्या कडेकोट भिंतीआड...