Translate

Which is the cheapest country to travel outside India? : विदेशी पर्यटन स्थळ (Budget Friendly) ज्यांची आपल्याला कल्पना पण नाही!

Which is the cheapest country to travel outside India? : पर्यटनाचं नियोजन करताना 'पैसा' निर्णायक भूमिका बजावतो. किफायतशीर खर्चात फिरण्याचा चांगला अनुभव देणारी भारतात अनेक पर्यटनस्थळ आहेत. विशेषतः जागतिक पातळीवर अलीकड़च्या काळात काही देश हे 'बजेट-फ्रेण्डली' म्हणून पर्यटकांमध्ये आणखी लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्याबहृल थोडक्यात जाणून घेऊ या.


Which is the cheapest country to travel outside India? : विदेशी पर्यटन स्थळ (Budget Friendly) ज्यांची आपल्याला कल्पना पण नाही!

Which is the cheapest country to travel outside India?

Table of Content

1) cheapest country to travel outside India


2) Budget friendly places outside India for couples


3) परदेशातही वापरता येणार युपीआय


पर्यटन नियमितपणे करण्याचे पुष्कळ फायदे असले तरी त्याच नियोजन उत्तम असायला हवं. अन्यथा आनंदाची नाही तर ताणतणावाची भटकंती पदरी पडते. त्यामुळे कुठल्याही सहलीची आखणी करताना प्रवासापासून वाहतुकीपर्यत आणि खाण्या-पिण्यापासून राहण्यापर्यंतचे सर्व घटक ध्यानात घ्यावे लागतात. पर्यटनाच्या नियोजनात नियमितपणे निर्णायक भूमिका बजावणारा घटक म्हणजे पैसा. कारण आपल्या बजेटनुसार भ्रमंतीचा आवाका ठरवला जाते. म्हणजे आलिशान भ्रमंती करण्यासाठी पैसा जास्त खर्च करावा लागतो. तर स्वस्तातला प्रवास करताना कित्येक गैरसोयी पदरी पड़तात. मात्र, भारतासह जगभरातही अशी काही ठिकाण आहेत, जी किफायतशीर खर्चात पर्यटनाचा चांगला अनुभव देतात. विशेषतः जागतिक पातळीवर अलीकडच्या काळात काही देश 'बजेट-फ्रेंडली' म्हणून पर्यटकांमध्ये आणखी लोकप्रिय झाले आहेत, अशा देशांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ या.

1) cheapest country to travel outside India


डोंगरी भातशेतीच सौंदर्य

निळाशार समुद्र, लहान- मोठया पर्वतांच सौंदर्य आणि हिरवीगार भातशेती असं सर्व काही एकाच ठिकाणी बघायच असेल तर व्हीएतनाम नक्की वेगळा अनुभव देऊन जाईल. केवळ नैसर्गिक सौदर्यंच नाही तर या देशाचा पुरातन वारसाही तेवढाच समृद्ध आहे. किफायतशीर पर्यटनासाठी व्हिएतनाम लोकप्रिय आहे. याच वैशिष्ट्यामुळे भारतीय पर्यटकसुद्धा या देेशाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.

व्हिएतनामची राजधानी असलेलं हनोई हे सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांपैकी एक समजलं जातं. हनोईमध्ये गुओम लेक, लॉन्ग बिएन ब्रिज, ३६-फो फुओंग ओल्ड क्वाटर्स, हो चि मिन्ह समाधी अशी काही ठिकाण आवर्जून बघण्यासारखी आहेत. तसंच इथल्या बाजारपेठा पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. या व्यतिरिक्त समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या डा नांग शहरामधला माय खे बीच सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर-व्हिएतनामची प्राचीन संस्कृतीची झलक पाहायची असेल तर होई आन शहराला आवर्जून भेट द्यावी. या शहरापासून जवळ असणारं माय सन अभयारण्य हे युनेस्कोने गौरवलेलं जागतिक वारसास्थळ आहे. त्याचबरोबर भातशेतीचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर सापा प्रदेशाचा सहलीत आवर्जून समावेश करावा.

व्हिएतनामची खाद्यसंस्कृतीही पर्यटनाच एक महत्वाच आकर्षण आहे. विशेषतः इथल स्ट्रीट फूडची चव चाखण्यासाठी येणारे उत्साही पर्यटक पाहायला मिळतील. शांत, प्रेमळ आणि इतिहास व आधुनिकतेचं सुंदर मिश्रण साधलेल्या या देशात पर्यटन करण्यासाठी साधारण जानेवारी ते एप्रिल आणि पुढे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी सोयीचा ठरू शकतो.

इसे जरूर पढ़ें:- Motivational Story in Hindi : जीवन की सबसे बड़ी सिख देने वाली मोटिवेशनल स्टोरी

Which is the cheapest country to travel outside India?


भव्य वास्तू, थर्मल बाथ आणि बरंच काही...

युरोपच्या मध्यभागी वसलेला हंगेरी हा देश पर्यटनासाठी नक्कीच वैशिष्टयपूर्ण आहे. भव्य वास्तू, मनाचा ठाव घेणारी वास्तुकला आणि शतकानुशतकांचा रोमांचकारी इतिहांस ही या देशाची पर्यटनाच्या द्रुष्टीने असणारी प्रमुख बलस्थान म्हणता येतील. तसंच थर्मल बाथचा अनुभव घेण्यासाठीसुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात.

हंगेरीमध्ये फिरण्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण म्हणजे बुडापेस्ट. राजधानीच शहर असलेल्या बुडापेस्टमध्ये युरोपच्या सुबत्तेच सार पाहायाला मिळतं. विशेषतः बुडापेस्ट हे जगभरातल्या अफोर्डेबल पर्यटनस्थळांपैकी एक आहे. शिवाय, निसर्गसौंदर्याने नटलेल्या हंगेरीची हवादेखील चांगली आहे. त्यामुळे अप्रतिम वास्तूस्थापत्य कलेपासून मनाला नवी ऊर्जा देणान्या थर्मल बाथपर्यंतची विविध आकर्षणांची अनुभूती घ्यायची इच्छा असेल आणि भारताबाहेर फिरण्याचा परिपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर बुडापेस्टची निवड करायला हवी. केवळ बुडापेस्टच नाही तर हंगेरीतली इतर शहरसुद्धा तुलनेने किफायतशीर आहेत.

हंगेरी देशात ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केल्याचं दिसून येतं. इथल्या अनेक वास्तूंना कित्येक शतकांची पाश्वभूमी आहे. युरोपीय प्रबोधन चळवळ तुर्की तसंच तुर्की आक्रमण आणि त्यांच्या पाऊलखुणा इथल्या इमारतींचा इतिहास दाखवतो. बुडापेस्टमध्ये बुडा कॅसल, हंगेरीयन संसद भवन, सेंट बॅसिलिका स्टीफन बॅसिलिका, फिशरमॅन्स बॅस्टन, हिरोज स्क्वेअर आणि चेन ब्रीज अशी काही ठिकाण आवर्जून बघावीत अशी आहेत. त्यानंतर डेब्रेसेन हे हंगेरीमधलं दुसऱ्या क्रमांकाच मोठ शहर आहे. हॉर्टोबगी राष्ट्रीय उद्यानासाठी हे शहर लोकप्रिय आहे. तर पेक्समध्ये मॉडर्न हंगेरियन गॅलरी, कल्वरल सेंटर आणि विविध संग्रहालयं पाहण्यासारखी आहेत. इतिहास, संस्कृती, परंपरा आणि किफायतशीर खर्चातली भ्रमंतीच हे अनोखं मिश्रण हंगेरीला पर्यटनाभिमुख ठिकाण बनवत.

Which is the cheapest country to travel outside India?


सांस्कृतिक वारशाच समृद्ध दर्शन

कमी किंवा मध्यम स्वरूपाचा खर्च डोळ्यासमोर ठेवून पर्यटनाचा बेत आखत असाल तर अझरबैजान एक चांगला पर्याय आहे. पूर्वी पर्यटनामध्ये फार ओळख नसलेलं अझरबैजान आज मध्यपूर्व, आशिया खंड आणि युरोपातल्या देशांमध्ये प्रवास करण्यासाठीचं महत्त्वाचं ठिकाण आहे. पूर्वेला कॅस्पियन समुद्र या प्रदेशाचं भौगोलिक सौंदर्य आणखी वाढवतो. अझरबैजानची राजधानी असलेलं बाकू हे तब्बल दोन हजारांहून अधिक जुन्या ऐतिहासिक कथा आणि सांस्कृतिक वारशाने समूद्ध असे शहर आहे. त्यामुळे या देशाला भेट देणारे पर्यंटक बाकूला हमखास भेट देतात. बाकूमध्ये शिरवंशाचा राजवाडा आणि मेडेन टॉवर ही दोन स्थळं आवर्जून पाहायला हवीत. या दोन्ही ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. बाकूमधील ऐतिहासिक इमारतींची स्थापत्यकला शहराचा दीर्घ प्रवास डोळ्यासमोर उभा करते. इथलं लघु पुस्तकांचं संग्रहालय आणि अझरबैजान नॅशनल कार्पेट म्युझियम या देशातली हस्तकला आणि स्थानिक संस्कृतीच दर्शन घडवत. गेल्या काही वर्षांमध्ये बाकू चित्रपटाच्या शुट्टिंगसाठी विशेष लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास आलं आहे.

थोडक्यात, बुडापेस्टमधला थर्मल बाथ असो किंवा व्हिएतनाची भातशेती, कमी खर्चात या देशांमध्ये चांगल पर्यटन करता येऊ शकतो. शिवाय, श्रीलंका, उझबेकिस्तान, थायलंड, नेपाळ, दुबई असे इतरही पर्याय आहेत जिथे आपल्या बजेटनुसार भटकंती करण्यास वाव आहे. पुढल्या परदेश सहलीचं नियोजन करताना या देशांचा विचार करायला हरकत नाही.


2) Budget friendly places outside india for couples

भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत, परंतु जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार काहीतरी नवीन आणि रोमांचक शोधत असाल तर तुम्ही भारताबाहेर प्रवास करण्याचा विचार करू शकता. जगभरात अनेक अद्भुत ठिकाणे आहेत जी जोडप्यांसाठी Budget friendly आहेत.

Budget friendly places outside India for couples


येथे काही Places आहेत:


1. श्रीलंका: श्रीलंका हे भारताच्या जवळच असलेले एक सुंदर बेट आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि चहाचे मळे पाहायला मिळतील. श्रीलंकेतील राहणे आणि खाणे तुलनेने स्वस्त आहे.

2. थायलंड: थायलंड हे आणखी एक लोकप्रिय Budget friendly अनुकूल ठिकाण आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि समृद्ध संस्कृती पाहायला मिळेल. थायलंडमध्ये अनेक Budget friendly हॉटेल्स आणि हॉस्टेल्स उपलब्ध आहेत.

3. व्हिएतनाम: व्हिएतनाम हा एक सुंदर देश आहे ज्यात डोंगराळ प्रदेश, जंगले आणि समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्हाला स्वादिष्ट खाद्यपदार्थ, प्राचीन मंदिरे आणि स्वस्त राहण्याची व्यवस्था मिळेल.

4. नेपाळ: नेपाळ हा भारताच्या जवळच असलेला एक डोंगराळ देश आहे. येथे तुम्हाला हिमालयाचे विहंगम दृश्य, प्राचीन मंदिरे आणि साहसी उपक्रम पाहायला मिळतील. नेपाळमध्ये राहणे आणि खाणे तुलनेने स्वस्त आहे.

5. कंबोडिया: कंबोडिया हा एक सुंदर देश आहे ज्यात प्राचीन मंदिरे, जंगले आणि समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्हाला स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि स्वस्त राहण्याची व्यवस्था मिळेल.

6. इंडोनेशिया: इंडोनेशिया हे जगातील सर्वात मोठे बेट राष्ट्र आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, ज्वालामुखी, जंगले आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील. इंडोनेशियामध्ये अनेक Budget friendly हॉटेल्स आणि हॉस्टेल्स उपलब्ध आहेत.

7. मलेशिया: मलेशिया हा एक समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा देश आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, आधुनिक शहरे आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील. मलेशियामध्ये अनेक Budget friendly हॉटेल्स आणि हॉस्टेल्स उपलब्ध आहेत.

8. सिंगापूर: सिंगापूर 
हा एक विकसित देश आहे ज्यात आधुनिक शहरे, सुंदर उद्याने आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहेत. सिंगापूरमध्ये अनेक Budget friendly हॉटेल्स आणि हॉस्टेल्स उपलब्ध आहेत.

9. फिलीपिन्स: फिलीपिन्स हा सुंदर बेटांचा देश आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, ज्वालामुखी, जंगले आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील. फिलीपिन्समध्ये अनेक Budget friendly हॉटेल्स आणि हॉस्टेल्स उपलब्ध आहेत.

10. म्यानमार: म्यानमार हा एक सुंदर देश आहे ज्यात प्राचीन मंदिरे, जंगले आणि समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्हाला स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि स्वस्त राहण्याची व्यवस्था मिळेल.


या ठिकाणी प्रवास करताना तुम्ही खालील गोष्टी लक्षात ठेवू शकता:

* ऑफ सीझनमध्ये प्रवास करा: ऑफ सीझनमध्ये प्रवास करणे हा खर्च कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ऑफ सीझनमध्ये हवाई तिकीट आणि राहण्याची व्यवस्था स्वस्त असू शकते.

* स्थानिक वाहतूक वापरा: स्थानिक वाहतूक, जसे की बस, रेल्वे किंवा रिक्षा, वापरणे हा खर्च कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. टॅक्सी किंवा खासगी वाहतूक टाळा.

* घरगुती जेवण करा: स्थानिक रेस्टॉरंट्सऐवजी घरांमध्ये किंवा स्थानिक बाजारपेठांमधून 
जेवण करणे हा खर्च कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुम्ही स्थानिक पदार्थांचा अनुभव घेऊ शकाल आणि पैसाही वाचवू शकाल.

* Free किंवा स्वस्त पर्यायांचा आनंद घ्या: अनेक ठिकाणी अनेक मोफत किंवा स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत, जसे की संग्रहालये, उद्याने किंवा धार्मिक स्थळांना भेट देणे. तुम्ही स्थानिक उत्सव किंवा कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.

* एका ठिकाणी अधिक काळ रहा: एका ठिकाणी अधिक काळ राहणे हा खर्च कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. अनेक ठिकाणी दीर्घकाळाचा मुक्काम असलेल्यांसाठी सवलत देतात.

• पूर्व नियोजन करा: तुमच्या प्रवासाचे पूर्व नियोजन केल्याने तुम्ही चांगल्या हॉटेल आणि फ्लाइट्सवर Deals करू शकता.

• तुमच्या वस्तूंचा भार हलका ठेवा: विमानातून प्रवास करताना तुमच्यासोबत कमी सामान असल्यास तुम्ही बॅगेज फी वाचवू शकता.

• स्थानिक लोकांशी संवाद साधा: स्थानिक लोकांशी संवाद साधल्याने तुम्हाला स्वस्त खाण्याची ठिकाणे, आकर्षणे आणि वाहतूक पर्याय शोधण्यात मदत होऊ शकते.

• तुमच्या प्रवासासाठी Travel कार्ड किंवा सिटी पास खरेदी करणे फायदेमंद ठरू शकते. यामुळे तुम्ही सार्वजनिक वाहतूक, संग्रहालये आणि इतर आकर्षणांवर प्रवेश शुल्क कमी करू शकता.

* तुमच्या प्रवासाचा विमा काढणे महत्त्वाचे आहे. यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकेल.

• तुमच्या प्रवासाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी फ्लाइट आणि राहण्याची व्यवस्था महाग होऊ शकते. म्हणून, शक्य असल्यास तुमच्या प्रवासाची आगाऊ बुकिंग करा.

भारताबाहेर प्रवास करणे हा एक रोमांचक आणि फायदेमंद अनुभव असू शकतो. थोड्याशा नियोजनाने आणि या Tips चा वापर करून तुम्ही आणि तुमचा जोडीदार भारताबाहेर Budget friendly एक अविस्मरणीय ट्रिपची योजना आखू शकता.


3) परदेशातही वापरता येणार युपीआय

क्यूआर कोड स्कॅन करून आर्थिक व्यवहार करण्याची मुभा देणारी यूपीआय सूविधा आपल्या सर्वांच्याच अंगवळणी पडली आहे. विशेष म्हणजे आता भारताबाहेरही सहा देशांत ती वापरता येऊ शकते. त्यामुळे परदेशी प्रवासात आवडीच्या वस्तू खरेदी करताना या सुविधेचा वापर करता येईल.

परदेशातही वापरता येणार युपीआय


युनिफाइड पेमेण्टस इण्टरफेस अर्थात यूपीआय सुविधा वापरणाऱ्या कोट्यवधी भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. खरेदी-विक्री तसंच पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रामुख्याने भारतात वापरली जाणारी यूपीआय पेमेण्ट ॲप्स आता परदेशातही वापरता येऊ शकतात. सध्या भारताबाहेर सहा देशांत यूपीआय वापरता येऊ शकते. त्यामुळे परदेशात आवडीच्या वस्तूंची खरेदी करताना या सुविधेचा वापर करता येईल. भारत सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी ही सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यासाठी सक्रिय प्रयल केले आहेत. परंतु, अशा प्रकारची सुविथा अधिक व्यापक पाळीवर स्वीकृत करण्यासाठी आवश्यक असणार नेटवर्क आणि पायाभूत सुविथा विकसित करण्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी परदेशात जाणार तर यू्पीआय सेवेचा लाभ जरूर घ्या; पण सोबत स्वतःचं कार्डदेखील बरोबर घ्यायला विसरू नका. देयक प्रणालीमधल्या (पेमेण्ट सिस्टिम) प्रमुख संस्थांपेकी किमान एकाने जरी, जसं फिनटेकने यूपीआयसाठी केलं तस प्रोत्साहन जागतिक देयकांना (ग्लोबल पेमेण्ट्स) देण्यास सुरुवात केली, तरी ही प्रक्रिया आणखी वेगवान होऊ शकते.


या देशांत वापरू शकता यूपीआय

एनपीसीआयने क्यूआर कोडद्वारे पेमेण्ट स्वीकारण्यासाठी सिंगापूर, यूएई, श्रीलंका, मॉरिशस आणि भूतान या देशांमधल्या स्थानिक नेटवर्कशी भागीदारी केली आहे. फ्रान्समध्ये तर संबंधीत बुकिंग वेबसाइटवर क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला आयफेल टॉवरलाही भेट देता येऊ शकते. भारताबाहेर ही सेवा लागू झाली असली तरी तिचा वापर काही ठराविक ठिकाणीच करता येतो. परंतु, यूपीआय पेमेण्ट स्वीकारणाऱ्या दुकानांची (परदेशातली) संख्या आगामी काळात हळूहळू वाढेल, अशी अपेक्षा आहे.


तुम्ही काय कराल ?

यूपीआय ॲपवर आंतरराष्ट्रीय देयकांचा पर्याय उपलब्ध आहे की नाही, हे तपासून पाहा. मग, ज्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचा आहे, अशा ग्राहकांनी तो पर्याय निवडा. भीम, फोनपे, गुगल पे यांच्याद्वारे थेट आंतरराष्ट्रीय व्यवहार करता येऊ शकतात. त्याचबरोबर यूपीआय सेवा सुरू असलेल्या देशांमध्ये गेल्यावर ही सुविधा स्वीकारणाऱ्या दुकानांचा शोध ग्राहकांना घ्यावा लागेल. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे दुकान वा मरचंट आऊटलेटमध्ये किंवा वेबसाइटवर यूपीआय किंवा भीम यूपीआयचा लोगो शोधण. कारण अजून तरी यूपीआय स्वीकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय आऊटलेट्सची संख्या नेमकी किती आहे, याचा केंद्रीकृत डेटाबेस उपलब्ध नाही.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

Read Also:-

1)  Picnic Spot in Maharashtra : बापरे इतने गजब के Picnic Spot


2) dudhsagar trek : दूधसागर के आसपास की ये चमत्कारिक जगहें आपको अवश्य देखनी चाहिए


3) Haryana Popular Places : पानीपत की ये जगह बन रही है टूरिस्टों की नजरों का तारा, जानिए वह जगह कोनसी हैं.


4) Lakshadweep Tour Places : 'लक्षद्वीप' या आठवड्यात भारतीयांच्या ‘गुगल सर्च’ मध्ये ट्रेडिंगमध्ये चर्चेत असणाऱ्या बेटाविषयी माहिती.


5) Kokan Darshan : कोकणातील प्राकृतिक सौंदर्याने युक्त दुर्लक्षित ठिकाणे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.