You can use Google Translate to read Article in any Language. See above Top side given the Google Translate Box
हे जरूर वाचा:- Dinacharya - Ritucharya PDF : उत्तम आरोग्यासाठी महत्वाची दिनचर्या आणि ऋतुचर्या PDF मध्ये
Viral News
रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय (International Market) बाजारात विशेष मागणी
रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. बाजारात रक्तचंदनाची विक्री प्रतिकिलो 5 ते 6 हजार रूपयांच्या दराने होते. विशेषतः, चीनमध्ये रक्तचंदनाची अत्यधिक मागणी आहे. रक्तचंदनाचा वापर उच्च गुणवत्ताच्या दारू, आयुर्वेदिक औषधे, आणि मूर्ती तयार करण्यासाठी केला जातो. तसेच, आयुर्वेदानुसार, रक्तचंदनाचा वापर सुज किंवा मुकामार लागल्यास केला जाऊ शकतो. याचे परिणाम म्हणजे, या अत्यंत दुर्मिळ झाडाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या अवकाशात आहे.
रक्तचंदनाचं झाड कोकणात कसं आलं (Red sandalwood)
कोकणच्या देवराईत दीडशे वर्षांपूर्वी रक्तचंदनाचं झाड उभारलेलं आहे. पण, हे झाड कोकणात कसं आलं, याची माहिती कोणत्याही ठिकाणी सापडत नाही. अल्लू अर्जुनच्या मुख्य भूमिकेतील बॉलिवू़ड चित्रपट 'पुष्पा’मध्ये रक्तचंदनाच्या झाडांची तस्करी कशी केली जाते, हे दाखवले गेले आहे. हि रक्तचंदनाची झाड वनात खोलवर सापडतात. रक्तचंदनाचं झाड हे विशेषतः तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांमध्ये आढळते. अनेक वर्षांपूर्वी कोकणातील कातकरी समाज जंगलात जात असताना हे अद्वितीय झाड सापडले होते.
एकदा बैलाची तब्बेत बिघडली होती, कातकरी समाजाने त्याच्या आरोग्यासाठी ह्या झाडाची साल उगाळून बैलाला दिली, ज्यामुळे बैलाची प्रकृती उत्तम झाली. त्यानंतर, हे झाड औषधी असल्याची ख्याती कोकणात पसरली. ह्या झाडाच्या अद्वितीयतेमुळे, त्याची तोडणी करण्याचे प्रयत्न झाले, पण त्याची औषधी गुणधर्मे आणि दुर्मिळता पाहून, गावकऱ्यांनी ठरविले की ह्या झाडाची तोडणी करायची नाही. काही अभ्यासकांनी या झाडाच्या अभ्यासातून त्याची ओळख रक्तचंदनाच झाड असल्याच खात्रीने सांगितल. पण, हे झाड कोकणच्या वनात कसं आलं, कोणी लावल ह्या ची कोणतीही माहिती सापडत नाही. गावकरी म्हणतात की पक्षांच्या विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांच्या काळात ह्या झाडाची लावणी केली गेली असावी.
Viral News : बापरे २४ तास झाडाची सुरक्षा
झाडाची प्रसिद्धी वाढल्यानंतर, हे झाड चोरण्याचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर, पोलीस, गावकरी आणि महसुल विभागाने मिळून ठरवले की या ठिकाणी नियमित गस्त घातली जाईल. महसुल विभागाने या झाडावर विशेष लक्ष ठेवलेलं आहे.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.