Dinacharya - Ritucharya PDF : दिनचर्या आणि ऋतुचर्या हे आयुर्वेदाचे दोन महत्वाचे सिद्धांत आहेत. दिनचर्या म्हणजे दिवसाच्या वेळेनुसार आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहार, विहार, विश्राम आणि व्यायामाचे नियम ठरवणे. ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार (वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म) आपल्या शरीराच्या जरूरी बदलांचे स्वीकारण करणे. दिनचर्या आणि ऋतुचर्या आपल्याला विविध रोगांपासून बचावतात, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, आपल्या मनाला शांत आणि संतुलित ठेवतात. दिनचर्या आणि ऋतुचर्या आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सुख घेऊन येतात. या लेखाचा उद्देश दिनचर्या आणि ऋतुचर्या यांच्या महत्त्वाचे विषय आपल्याला समजवण्यासाठी आहे. आम्ही या लेखात दिनचर्या आणि ऋतुचर्या यांची परिभाषा, उद्दिष्ट आणि फायदे PDF मध्ये देऊ. आम्ही आशा करतो की हा PDF मधील लेख आपल्याला आयुर्वेदाच्या या अद्भुत सिद्धांतांचा ज्ञान देईल आणि आपल्या जीवनात आरोग्य आणि सुख निर्माण करण्यास मदत करेल. आपण दिनचर्या आणि ऋतुचर्या ची माहिती PDF मध्ये Free Download करू शकता.
PDF Name :- Dinacharya - Ritucharya PDF : उत्तम आरोग्यासाठी महत्वाची दिनचर्या आणि ऋतुचर्या PDF मध्ये
No. of Pages :- 9
PDF Size :- 203 KB
Language :- Marathi
__________________________________________________________________________________
Dinacharya - Ritucharya PDF
पहिले आपण दिनचर्या पाहू नंतर ऋतुचर्या पाहू.
सर्वांसाठी दिनचर्या
१. सूर्योदयाच्या दीड तास आधी उठा. हा
ब्राम्हमुहुर्त चिंतन, मनन, अभ्यासासाठी
उत्तम,
एकाग्रतादायी असतो.
२. प्रथम सकाळी उठून पाणी प्या, सकाळी उठून पाणी प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात.
३. आयुर्वेदिक पावडरीने ब्रश करा, जीभ स्वच्छ करा.
४. सर्वप्रथम मूत्र - शौच विसर्जन व्यवस्थित होणे आवश्यक. पोट साफ नसल्यास रात्री त्रिफळा टॅबलेट घ्या.
५. डोळ्यात काजळ घाला.
६. कान साफ करा, कानात खोबरेल तेल टाका.
७. आडवे झोपून मान थोडी वर ठेवून नाकात दोन थेंब गाईचे तूप सोडा, दोन मिनीटे तसेच झोपून रहा व दोन मिनिटांनी उठा, हे नस्य इंद्रीयांचे तेज वाढवते.
८. शरीराला तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा तेजस्वी
राहते. डोळे, केस, टाळू, तळपायालाही तेल चोळा.
९. शरीर शक्तीच्या अर्धा व्यायाम करा.
१०. कोमट पाण्याने किवा साध्या पाण्याने आंघोळ करा.
११. स्वच्छ, सैल कपडे परिधान करा.
१२. ईश्वराचे स्मरण/ध्यान:- मन एकाग्र होते, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण दूर होतो. ताणतणावामुळे कोणतेही शारीरिक व मानसिक आजार होत नाहीत. ध्यानासाठी ईश स्मरण चांगल्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा.
१३. जेवताना, मन प्रसन्न ठेवा, षड्रसयुक्त आहार घ्या.
१४. ६ ते ८ तास नैसर्गिक शांत झोप घ्या.
१५. ऋतुप्रमाणे वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या. हेमंत ऋतुत नित्य, वसंत, शरद ऋतुत मध्यम व ग्रीष्मात कमी. (दिनचर्या व ऋतुचर्याचे पालन केल्याने शरीर निरोमी व तेजस्वी बनते.)
१६. हीमोग्लोबिन कमी असल्यास खजूर, मनूके, तिळ, जांभूळ, नाचणी, मसूर, शेंगदाणे, डाळिंब, राजगिरा, अंजीर, खारीक,
संत्री, मोसंबी, आंबा, पपई, द्राक्षे, आवळा, केळी खा.
Dinacharya - Ritucharya PDF
ऋतुचर्या
१) सूर्य कमी प्रखर वात दोष जास्त
* वर्षा ( २२ जून ते २२ ऑगस्ट ) :- भूक कमी - पचन मंद त्यामुळे पचायला हलके पदार्थ कमी खा, पापड न तळता शेकून खा. तेल, तूप कमी वापरा. गरम पाणी प्या. गरम पाण्याने स्नान करा, तेलाचा मसाज करा, पॉलिएस्टरचे कपडे वापरा, लवकर वाळतील, व्यायाम कमी करा. पाण्याबरोबर रोज अश्वगंधा टॅब्लेट घ्या.
२) पित्तदोष जास्त
* शरद ( २२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर ) रेचक त्रिफळा टॅब्लेट रात्री घ्या. तुपाचा वापर करा. तिखट कमी पापरा. मध्यपानवर्ज करा, सुतिकपडे वापरा. चामड्याच्या चपला, बूट वापरा. छत्री, गॉगल वापरा. जेवणात मेथी, हळद, कडीपत्ता, कांद्याचा वापर करा. शीतल चांदण्यात बसा.
3) थंडी
* हेमंत (२२ ऑक्टोबर ते २२ डिसेंबर):- या ऋतुत भूक जास्त लागते. घाम कमी येतो. स्निग्ध, जड आहार घ्या. दूध, तेल, तूप, गहू, उडीद, मूग, बटाटे ई. खा. भरपूर व्यायाम करा. अभ्यंग स्नान करा. अश्वगंधा टॅब्लेट रोज घ्या.
४) थंडी
• शिशिर ( २२ डिसेंबर ते २२ फेब्रुवारी ) :- या ऋतुत शरीर शक्ति कमवा आणि वर्षभर ती वापरा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. तेल, तूप, पौष्टिक आहार, जड न्याहारी, भाज्या, फळे या ऋतुत खाल ते पचेल. दही सुद्धा या ऋतुत रोज खाल्ले तरी पचेल. मालीश करा. अश्वगंधा टॅब्लेट घ्या.
५) कफ दोष जास्त
• वसंत (२२ फेब्रुवारी ते २२ एप्रिल ) :- उन्हाळा प्रखर लोणी, तूप वापरा. गरम पाणी, हलका आहार घ्या. जुने धान्य, तेलाचा वापर करा. जलचर मांस या ऋतुत नको. सैलसर सूती कपडे घाला. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
६) उन्हाळा
* ग्रीष्म ( २२ एप्रिल ते २२ जून ) :- दिवस मोठा रात्र छोटी. पाणीदार फळे, धने, जिऱ्याचे पाणी, नारळ पाणी, कलिंगड, कैरीचे पन्हे प्या. आंबा खा. उत्तम पचनासाठी आंब्यात मिरपूड किंवा सुंठ किंवा तूप घालून घ्या. व्यायाम करा. दिवसा झोपलेले या ऋतुत चालेल.
जाणून घ्या आपली
प्रकृती |
|||
|
वात |
पित्त |
कफ |
त्वचा |
रुक्ष |
स्निग्ध |
मुलायम |
बांधा |
सडपातळ |
योग्य |
मजबूत |
केस |
पातळ, रुक्ष |
पातळ, पांढरे |
दाट, मुलायम |
झोप |
कमी, अशांत |
अशांत |
शांत, गाढ |
भूक |
अनियमित |
जास्त |
उत्तम |
स्मरण |
उत्तम पण
तात्पुरते |
चांगले |
उत्तम |
आहार सेवन करा |
गोड, आंबट खारट,
गरम |
गोड, तुरट, कडू,
थंड |
तुरट, कडू, तिखट,
हलके |
सहन शक्ति |
अनियमित
स्वरूप |
कमी |
उत्तम |
वर्ण |
सावळा |
गोरा |
गव्हाळ |
जाणून घ्या आपली प्रकृती. कफ, वात,
पित्त हे तिन्ही दोष व्यक्तीच्या शरीरात कमी, अधिक किंवा संतुलित स्वरूपात
असतात. त्यांना संतुलित ठेवण म्हणजेच आरोग्य उत्तम राखण. |
आपण खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून Dinacharya - Ritucharya PDF : उत्तम आरोग्यासाठी महत्वाची दिनचर्या आणि ऋतुचर्या PDF मध्ये डाउनलोड करू शकता.
Dinacharya - Ritucharya PDF दिनचर्या आणि ऋतुचर्या PDF Download 👇