Palm Beach Road : पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी, फोटोग्राफर्स आणि प्रवाशांना नवी मुंबईतील 'पाम बीच रोड' नेहमीच भुरळ घालतो. या मनमोहक रस्त्याची निर्मिती कशी झाली? इथे लोकवस्ती कशी झाली ? असे प्रश्न अनेकांना पडतात. आजच्या आर्टिकल मधून या रस्त्याचा इतिहास जाणून घेऊ या.
Palm Beach Road
मुंबई शहराच्या भौगोलिक आणि नैसर्गिक रचनेमुळे येथील लोकवस्तीचा विकास विशिष्ट मर्यादेपर्यंतच होऊ शकतो. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं मुंबईच्या शेजारी ३४४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवी मुंबई हे शहर वसवलं. या शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सिडकोची स्थापना १९७० साली झाली आणि मुंबईच्या पूर्वेला असणाऱ्या ठाण्याच्या खाडीच्या पलीकडे नव्या मुंबईचा आराखडा तयार झाला. या शहरातील 'पाम बीच रोड' हा अत्यंत प्रसिद्ध रस्ता. शीव-पनवेल रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या रस्त्याची निर्मिती झाली. ठाणे-बेलापूर रस्त्याला समांतर धावणारा हा सहा पदरी रस्ता वाशीपासून बेलापूरपर्यंत जवळपास १० किमी लांबीचा आहे. नागरिकांना पर्यावरणाची आस्था वाटावी आणि त्याबद्दल जागरूकता व्हावी, म्हणून १९९५ मध्ये सिडकोनं या नव्या शहरातील महत्त्वाच्या आठ रस्त्यांच्या कडेनं विशिष्ट वृक्षांची लागवड करून त्या वृक्षांची नावं रस्त्यांना दिली. रेन ट्री मार्ग (बेलपाडा ते टाटा कॅन्सर हॉस्पिटल), आम्र मार्ग (उरण फाटा ते राष्ट्रीय महामार्ग-४), जांभूळ मार्ग (तुर्भे ते वाशी), नीम मार्ग (ठाणे ते बेलापूर) आणि पाम बीच मार्ग. ही त्यापैकीच काही नावं.
इसे जरूर पढ़ें:- Life Changing Motivation : जीवन में शादी और पैसे के लिए मेहनत नहीं करनी पड़ती ये केवल प्रारब्ध होता है। कैसे जानिए .....
इसे जरूर पढ़ें:- Life Changing Motivation : जीवन में शादी और पैसे के लिए मेहनत नहीं करनी पड़ती ये केवल प्रारब्ध होता है। कैसे जानिए .....
पाम बीच रोडच्या दुभाजकांमधील जागेत रॉयल पाम जातीच्या सुंदर आणि राजर्षी दिसणाऱ्या ३२०० झाडांची लागवड केली. अगदी सुरुवातीपासूनच हा रस्ता नागरिकांच्या पसंतीस उतरला. राजेशाही भासणाऱ्या रॉयल पामच्या झाडांच्या तळाजवळ बोगनवेल लावण्यात आली, तर रस्त्याच्या शेजारी सेवा रस्त्याच्या कडेला रेन ड्रॉप आणि पेल्ट्रोफॉरम (ताम्रवृक्ष किंवा पीत मोहोर) प्रजातीच्या झाडांची लावणी करून आरास करण्यात आली. एकंदरीतच अशा विलोभनीय वृक्षांमुळे रस्त्याला देखणेपणा प्राप्त झाला आणि तेव्हापासूनच या रस्त्याला 'पाम बीच रोड' म्हणून 'नावलौकिक' प्राप्त झाला.
सिडकोनं नवी मुंबई शहराची आखणी करताना पाश्चात्य शहरांच्या स्थापत्याशी साधर्म्य ठेवल्यानं, या मार्गावरून जाताना विदेशात असल्याचा भास होतो. रस्त्याच्या एका बाजूला ठाण्याची खाडी असल्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी इथलं दृश्य मंत्रमुग्ध करणारं असतं. खाडीला लागून असलेलं खारफुटीचं जंगल आणि पाणवठे आव पर्यावरणप्रेमी लोकांसाठी आवडीचं ठिकाण आहे. इथे फ्लेमिंगो पक्ष्यांसह देशांतर करणारे इतर विदेशी समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणावर मुक्कामी असतात. त्यामुळे फोटोग्राफर्स आणि पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी असते. पश्चिमेच्या क्षितिजावर भांडुप-मुलुंडची मिठागरे आपल्याला भुरळ घालतात. त्यामुळेच या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या भूखंडांवर निवासी इमारती उभ्या राहिल्या. उंच इमारतींच्या खिडक्या आणि सज्जांमधून मावळतीच्या सूर्याचं दर्शन घेणं सुलभ झालं आणि या भागामध्ये गर्भश्रीमंतांच्या टोलेजंग इमारतींनी रस्त्याच्या शाहीपणात भर घातली. मुंबई आणि पुणे, अलिबाग किंवा कोकणाकडे जाणारे प्रवासी व पर्यटक मुद्दाम वाट वाकडी करून पाम बीच रस्त्यावरून प्रवास करतात. अनेकदा मुंबईतील हौशी व्यक्ती खास पाम बीच रोडची सफर दुचाकी अथवा चार चाकीतून लाँग ड्राइव्ह म्हणून आवर्जून करतात.
पाम बीच रोड (Palm Beach Road) आता घणसोलीपर्यंत विस्तारला आहे, परंतु त्याच्या लोकप्रियतेमुळे आणि सरळ मार्गिकेमुळे अपघात प्रवण झाला आहे. सिडकोनं निर्माण केल्यानंतर हा रस्ता नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केला, त्यामुळे त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे काही अंशी दुर्लक्ष झालं आहे. याच रस्त्यावर १९९३ साली भारतीय समुद्री विश्वविद्यालयाचा घटक असलेली टी. एस. चाणक्य (ट्रेनिंग शिप चाणक्य) ही समुद्री शिक्षण देणारी संस्था अस्तित्वात आली आहे. पाम बीच रोड हा नवी मुंबई शहराचा 'क्वीन्स नेकलेस' आहे.
Read Also:-
1) Viral News : बापरे २४ तास सुरक्षा असलेल कोकणातील झाड, शंभर कोटींचं झाड तुम्ही कधी पाहिले आहे का ?
3) Highway Food : दाल-बाटी, सुक्क मटण आणि बरंच काही.. तर या हायवे फूडला एकदा नक्की भेट द्या!
4) dandpatta : लवलव करी धारदार पातं
5) top 10 patanjali products : पतंजलि के 10 गजब के प्रोडक्ट्स जो आपको जरूर ट्राय करने चाहिए.
6) IT Hub in Bangalore : काचेच्या कडेकोट भिंतीआड...